Join us  

फोनपासून कारपर्यंत सर्व काही स्वस्त होणार! टाटा समूहाची मोठी घोषणा, 'हे' होणार मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 4:20 PM

टाटा गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारणार असल्याचे टाटा समूहाचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

टाटा समुह गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी  दिली.  टाटा समूह गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर कारखाना उभारणार आहे. येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये बोलताना चंद्रशेखरन म्हणाले की, समूह दोन महिन्यांत साणंदमध्ये लिथियम-आयन बॅटरी तयार करण्यासाठी 20 GW क्षमतेची गिगाफॅक्टरी सुरू करणार आहे. 

एन. चंद्रशेखर म्हणाले की, टाटा समूहाने एक संकल्प केला आहे जो पूर्ण होणार आहे. "सेमीकंडक्टर फॅबसाठी वाटाघाटी पूर्णत्वाकडे आहेत आणि आम्ही ते २०२४ मध्ये सुरू करू. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी बुधवारी सांगितले की, त्यांची कंपनी रिलायन्स हजीरा येथे भारतातील पहिली जागतिक दर्जाची कार्बन फायबर सुविधा उभारणार आहे. 

मुकेश अंबानी म्हणाले, “गेल्या १० वर्षांत, रिलायन्सने संपूर्ण भारतात जागतिक दर्जाची मालमत्ता आणि क्षमता उभारण्यासाठी US १५० अब्ज डॉलर (12 लाख कोटी) पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. "यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतवणूक फक्त गुजरातमध्ये झाली आहे." हरित वाढीमध्ये गुजरातला जागतिक आघाडीवर आणण्यासाठी रिलायन्स योगदान देईल, असे ते म्हणाले.

मुकेश अंबानी म्हणाले, "आम्ही गुजरातला २०३० पर्यंत अक्षय ऊर्जेद्वारे उर्जेच्या निम्म्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करू. “रिलायन्सने जामनगरमध्ये ५,००० एकरवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले आहे. "यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होतील आणि हरित उत्पादने आणि सामग्रीचे उत्पादन शक्य होईल ज्यामुळे गुजरात हरित उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार बनेल.

टॅग्स :टाटारिलायन्समुकेश अंबानी