मार्चमध्ये इलेक्ट्रिक आणि प्लग-इन हायब्रिड वाहनांच्या जागतिक विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २९% वाढ झाली आहे. याचवेळी भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारकडून देण्यात येत असलेले प्रोत्साहन आणि कंपन्यांकडून लाँच करण्यात येत असलेल्या नवनव्या मॉडेल्समुळे गेल्या आर्थिक वर्षात देशातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी १७ टक्क्यांनी वाढून १९.७ लाख युनिट्सवर पोहोचली आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतातील प्रवासी वाहनांच्या विक्रीने वार्षिक ४३ लाख युनिट्सचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. यात एसयूव्ही विक्रीचा वाटा ६५ टक्के आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सनं (सियाम) ही माहिती दिली आहे.
एसयूव्हींची मागणी वाढली
देशात एसयूव्हीसह इतर युटिलिटी वाहनांच्या विक्रीत वाढ आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रवासी वाहनांच्या एकूण घाऊक विक्रीत त्यांचा वाटा ६५ टक्के होता, जो २०२३-२४ मध्ये ६० टक्के होता. २०२४-२५ मध्ये युटिलिटी वाहनांची विक्री ११%ने वाढून २७,९७,२२९ युनिट्स झाली, जी २०२३-२४ मध्ये २५,२०,६९१ युनिट्स होती. त्या तुलनेत, प्रवासी कार विक्रीत १३ टक्क्यांनी घट झाली आहे.
इलेक्ट्रिक वाहनं विक्री
२०२४-२५ १९.७ लाख
२०२३-२४ १६.८ लाख
इलेक्ट्रिक-टू-व्हीलर | ११.५ लाख |
इलेक्ट्रिक तीनचाकी | ७ लाख |
प्रवासी वाहनांची निर्यात | ७.७ लाख |
दुचाकी विक्री | १,९६,०७,३३२ |
व्यावसायिक वाहने | ९,५६,६७१ |
तीनचाकी वाहने | ७,४१,४२० |