Lokmat Money > बिझनेस न्यूज > अरनॉल्ट यांच्या ५ अपत्यांची परीक्षा, २१२ अब्ज डॉलर्सचा उत्तराधिकारी काेण?

अरनॉल्ट यांच्या ५ अपत्यांची परीक्षा, २१२ अब्ज डॉलर्सचा उत्तराधिकारी काेण?

२१२ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीचा मालक लवकरच हाेणार घाेषित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 09:11 AM2023-04-25T09:11:11+5:302023-04-25T09:11:47+5:30

२१२ अब्ज डाॅलर्सच्या संपत्तीचा मालक लवकरच हाेणार घाेषित

Examination of five children in lunch break, who is Arnault's successor? | अरनॉल्ट यांच्या ५ अपत्यांची परीक्षा, २१२ अब्ज डॉलर्सचा उत्तराधिकारी काेण?

अरनॉल्ट यांच्या ५ अपत्यांची परीक्षा, २१२ अब्ज डॉलर्सचा उत्तराधिकारी काेण?

पॅरिस : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनाॅल्ट हे त्यांचा लक्झरी ब्रॅण्ड लुई वुईटनचे साम्राज्य चालविण्यासाठी उत्तराधिकारी निवडणार आहेत. यासाठी त्यांनी नुकतीच त्यांच्या पाच मुलांची ऑडिशन घेतली. त्यासाठी त्यांनी ‘लंच टाइम’ निवडला. प्रत्येक महिन्यात ही परीक्षा होते. ७४ वर्षीय अरनाॅल्ट स्वतंत्रपणे प्रत्येक मुलाची भेट घेतात. ही भेट बहुतांश वेळेत दुपारच्या जेवणादरम्यान हाेते. 

अरनाॅल्ट यांनी विचारले, तुमच्याकडे काय याेजना?
अरनाॅल्ट जवळपास ९० मिनिटांपर्यंत चर्चा करतात. विविध व्यवस्थापकांसंदर्भात ते मुलांची मते जाणून घेतात. तसेच व्यवसायासाठी प्रत्येकाकडे काेणत्या याेजना आहेत, हेदेखील जाणून घेतात. 

इलाॅन मस्क यांना टाकले मागे
बर्नार्ड अरनाॅल्ट हे अखेरीस इलाॅन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. त्यांच्याकडे २१२ अब्ज डाॅलर्स एवढी संपत्ती आहे.

 

Web Title: Examination of five children in lunch break, who is Arnault's successor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.