नवी दिल्ली : आपल्या मजबूत आर्थिक वृद्धीबाबत अवाजवी प्रचार करणे भारतासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी सांगितले की, देशात संरचनात्मक समस्या आहेत. त्या दूर कराव्या लागतील. तरच भारत पूर्ण क्षमतेने विकास करू शकतो. २०४७ पर्यंत भारतास एक विकसित अर्थव्यवस्था बनविण्याचे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य रघुराम राजन यांनी फेटाळून लावले.
वृद्धीबाबत अवाजवी प्रचार करणे धोकायदायक : रघुराम राजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:06 AM