देशात Broadband Internet सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. परंतु एक कंपनी Reliance Jio च्या प्लॅनलाही टक्कर देत आहे. ही कंपनी म्हणजे Excitel. ही कंपनी सध्या ग्राहकांना अतिशय परवडणाऱ्या दरात सेवा देत असून अन्य कंपन्यांना टक्कर देत आहे. जर तुम्हाला चांगली आणि उत्तम इंटरनेट सेवा असेल तर तुमच्या यादीत नक्कीच पहिलं नाव Jio-Fiber चं असेल. परंतु Excitel या कंपनीचे प्लॅन्स जिओ फायबरला टक्कर देणारे आहेत. केवळ JioFiber च नाही, तर Airtel Xstream Fiber, आणि BSNL च्या सेवांनाही हे प्लॅन्स टक्कर देत आहेत.
Excitel ही कंपनी आपल्या ग्राहकांना केवळ तीन ब्रॉडबँड प्लॅन्स ऑफर करत आहे. 100 एमबीपीएस, 200 एमबीपीएस आणि 300 एमबीपीएस डाउनलोड/अपलोड असे कंपनीचे प्लॅन्स आहेत. दरम्यान, कंपनी कोणत्याही FUP सह ग्राहकांना अनलिमिटेड इंटरनेट सेवा ऑफर करत आहे.
स्वस्त आहेत Broadband Plans100 Mbps स्पीड असलेला बेस प्लॅन ग्राहकांना 699 रुपये प्रति महिना दराने विकत घेता येऊ शकतो. तर 200 Mbps आणि 300 Mbps प्लॅन अनुक्रमे 799 आणि 899 रुपये दराने विकत घेता येऊ शकतात. याशिवाय तुम्ही जितक्या मोठ्या वैधतेसाठी प्लॅन्स निवडाल तितके हे प्लॅन्स स्वस्तही होत जातात.
जर तुम्ही 12 महिन्यांसाठी 100 MBPS चा प्लॅन घेतला तर तुम्हाला दरमहा 399 रूपये द्यावे लागतील. हीच बाबत 200 MBPS आणि 300 MBPS वरही लागू होते. जर ग्राहकांनी किमान तीन महिन्यांसाठी प्लॅन खरेदी केला तर कंपनी आपल्या 300 MBPS च्या प्लॅनसह OTT चे लाभही देतात. दुसरीकडे जिओ फायबर आपल्या ग्राहकांना 3.3 TB च्या कॅपिंगसह प्लॅन ऑफर करते.