Lokmat Money > बिझनेस न्यूज > वॉरन बफे यांची एक्झिट, आता 'या' दोन परदेशी गुंतवणूकदारांची एन्ट्री; Paytm मध्ये ₹१०३९ कोटींची गुंतवणूक

वॉरन बफे यांची एक्झिट, आता 'या' दोन परदेशी गुंतवणूकदारांची एन्ट्री; Paytm मध्ये ₹१०३९ कोटींची गुंतवणूक

काही दिवसांपूर्वी दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांनीही कंपनीतून एक्झिट घेतली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 03:22 PM2023-11-27T15:22:03+5:302023-11-27T15:22:24+5:30

काही दिवसांपूर्वी दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांनीही कंपनीतून एक्झिट घेतली होती.

Exit of Warren Buffet now entry of two new foreign investors rs 1039 crore investment in Paytm | वॉरन बफे यांची एक्झिट, आता 'या' दोन परदेशी गुंतवणूकदारांची एन्ट्री; Paytm मध्ये ₹१०३९ कोटींची गुंतवणूक

वॉरन बफे यांची एक्झिट, आता 'या' दोन परदेशी गुंतवणूकदारांची एन्ट्री; Paytm मध्ये ₹१०३९ कोटींची गुंतवणूक

Paytm Share News: गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकीचा कल वाढत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकीवर जोखीम अधिक असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. सध्या शेअर बाजारातील पेटीएमच्या शेअरची चर्चा सुरू आहे. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी यांच्या बर्कशायर हॅथवेनं पेटीएमच्य मूळ कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकला. परंतु त्यांच्या एक्झिटनंतर अन्य २ परदेशी गुंतवणूकदारांची पेटीएममध्ये एन्ट्री झालीये. शुक्रवारी कामकाजाच्या अखेरीस बीएसईवर पेटीएमचा शेअर ८९३ रुपयांवर बंद झाला.

दोन जणांची गुंतवणूक
पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications Ltd मध्ये २ परदेशी गुंतवणूकदारांनी १०३९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. या अंतर्गत त्यांनी १.८६ टक्के हिस्सा खरेदी केलाय. Copthall Mauritius Investment Ltd नं ७५.७५ लाख शेअर्स म्हणजेच १.१९ टक्के हिस्सा खरेदी केला. परदेशी गुंतवणूकदारांनी ८७७.२० रुपये प्रति शेअरच्या दरानं हे शेअर्स खरेदी केले.  Finra data नुसार ही माहिती देण्यात आलीये.

आणखी एका अन्य परदेशी गुंतवणूकदार GHISALLO MASTER FUND नं कंपनीत ४२.७५ लाख शेअर्स म्हणजेच ०.६७ टक्के हिस्सा खरेदी केलाय. त्यांनी ३७५ कोटी रुपयांना हे शेअर्स खरेदी केले. 

बफेंची एक्झिट 
पेटीएमची मूळ कंपनी - वन ९७ कम्युनिकेशन्सच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, बर्कशायरनं कंपनीचे १७,०२७,१३० शेअर्स विकत घेतले होते आणि अधिग्रहणासाठी सरासरी किंमत प्रति शेअर १,२७९.७० रुपये होती. यानंतर, बर्कशायरनं २०२१ मध्ये वन ९७ कम्युनिकेशन्सच्या आयपीओमध्ये आपल्या स्टेकचा काही भाग विकला. आता बर्कशायर हॅथवेनं, त्याच्या बीएच इंटरनॅशनल होल्डिंग्सद्वारे, पेटीएममधील १५,६२३,५२९ शेअर्सचे संपूर्ण शेअर्स ८७७.२ रुपये प्रति शेअर या दरानं विकले.

Web Title: Exit of Warren Buffet now entry of two new foreign investors rs 1039 crore investment in Paytm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.