बंगळुरू : आयटी क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी इन्फोसिस आपल्या संचालक मंडळाचा विस्तार करणार आहे. संचालक मंडळावर आणखी दोन सदस्य घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संचालक मंडळाच्या विस्ताराच्या मुद्द्यावर कंपनीच्या संस्थापकांचा सल्ला घेतला जात आहे. संचालक मंडळावर घेण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या नावाची यादी संस्थापक तयार करीत आहेत. ही यादी नेमणुका आणि लाभ समितीला सादर केली जाईल. व्यवस्थापनाकडूनही यादी दिली जाणार आहे. या नावांचा समिती अभ्यास करील. यातून निवडक नावे संचालक मंडळाला सादर केली जातील. मंडळ अंतिम निर्णय घेईल.
कंपनीचे सध्याचे मुख्य वित्त अधिकारी एम.डी. रंगनाथ हे स्पर्धेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीचे संस्थापक आणि संचालक मंडळ यांच्यात नव्याने चर्चा होणार असल्याचे या वृत्तावरून स्पष्ट होते. कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी प्रवीण राव यांना देण्यात आलेल्या वेतनवाढीवरून कंपनीचे संस्थापक आणि संचालक मंडळ यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. (वृत्तसंस्था)
इन्फोसिस करणार संचालक मंडळाचा विस्तार
आयटी क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी इन्फोसिस आपल्या संचालक मंडळाचा विस्तार करणार आहे. संचालक मंडळावर आणखी दोन सदस्य घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
By admin | Published: April 25, 2017 12:33 AM2017-04-25T00:33:43+5:302017-04-25T00:33:43+5:30