मुंबई : भक्तांच्या लाडक्या गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेवले असताना खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येत आहे. बाजारातील काही प्रमाणातील मंदीचा मात्र विघ्नहर्त्यांच्या स्वागतावर कोणताही परिणाम झालेला नसून देशभरात उत्सवाच्या काळात तब्बल २० हजार कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा ‘असोचेम’च्या पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा १० दिवसांच्या उत्सव काळात ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
गणपतीत सर्वाधिक उत्साह असलेल्या मुंबापुरीत यंदा छोटे-मोठे तब्बल १५ हजार तर पुण्यातील जवळपास ५ ते ६ हजार गणेश मंडळे उत्सव साजरा करणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद (२ हजार), नागपूर (दीड हजार) येथेही गणपतीचा उत्साह दिसून येत आहे, असे ‘असोचेम’च्या (द असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री आॅफ इंडिया) पाहणी अहवालात नमूद करण्यात आले
आहे.
कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने यंदा गणेश मूर्त्यांची किंंमत २० ते २५ टक्क्यांनी वाढली आहे. शाडूची माती, रंग महागले आहेत. मात्र मोठ्या मूर्ती घेण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. भक्तांचा मोठ्या मूर्ती घेण्याकडेच कल दिसून येत आहे. गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तीसह मंडप व कार्यकर्त्यांसाठी विमा कवच घेतले असून त्यातही कोट्यवधींची उलाढाल झालेली आहे. यंदा मंडळांनी भव्य मंडपही उभारले आहेत. त्यामुळे डेकोरेटर्सचाही धंदा तेजीत आहे.
मुंबईत उधाण
-मोठ्या मंडळांच्या गणपतीबाप्पांना दागिन्यांचा साज असणार आहे.
-दागिन्यांमध्ये हिरे, माणिक-मोत्यांचाही समावेश आहे.
पूजेसाठी देणग्या
-लंबोदराच्या पुजेसाठी भक्तांकडून देणग्यांसह दागिने, विविध कार्यक्रमांचे प्रायोजकत्वही घेण्यात आले आहे. प्रसिद्ध गणपतींच्या पुजेसाठी देशविदेशातील भाविक इच्छुक असतात. त्यासाठी ते मोठमोठ्या देणग्याही देतात.
व्यवसायात तेजी
-गणेशोत्सवात व्यवसायातही मोठी तेजी आलेली दिसून येत आहे.
-उत्सवी वातावरणामुळे बाजारात खरेदीलाही उधाण आले आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिक खूश आहेत.
-यंदा महाराष्ट्रात दुष्काळ आहे. ग्रामीण भागात त्याचा परिणाम दिसून येत आहे. ग्रामीण भागातील गणेशोत्सवावर काही प्रमाणात दुष्काळाचा परिणाम राहील.
यंदा गणेशोत्सव काळात २० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित!
भक्तांच्या लाडक्या गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेवले असताना खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येत आहे. बाजारातील काही प्रमाणातील मंदीचा मात्र विघ्नहर्त्यांच्या
By admin | Published: September 15, 2015 03:55 AM2015-09-15T03:55:55+5:302015-09-15T03:55:55+5:30