लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना केंद्र सरकारने मंगळवारी दिलासादायक बातमी दिली. कोरोनाकहरामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांचे तीन हप्ते गोठविण्यात आले होते. प्रलंबित असलेल्या या तीन महागाई भत्त्यांची पूर्तता येत्या जुलै महिन्यापासून केली जाईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत सांगितले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणाले...
महागाई भत्त्याचे तीन हप्ते गोठविल्यामुळे सरकारची ३७,४३० कोटींची बचत झाली
या बचतीच्या रकमेचा वापर कोरोनाशी लढण्यासाठी करण्यात आला
मात्र, आता १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ हे तीनही हप्ते जुलैपासून दिले जातील
काय झाले?
n कोरोना कहरामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते गोठविण्यात आले आहेत
n त्यानुसार १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ हे तीन हप्ते थकीत आहेत
n गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केंद्र सरकारने हे तीनही हप्ते गोठविण्याचे ठरवले
n कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती लक्षात घेता १ जानेवारी २०२० पासूनचे महागाई भत्ते देता येणार नाहीत, असे त्या वेळी सरकारने जाहीर केले होते
महागाई भत्ता किती? : तूर्तास कर्मचाऱ्यांना १७% महागाई भत्ता मिळतो. त्यात ४% वाढ करण्याचा निर्णय गेल्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार आता केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना २१% महागाई भत्ता मिळणार आहे. १ जानेवारी २०२१ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार होती. मात्र, कोरोनामुळे निर्णय स्थगित करण्यात आला होता