नवी दिल्ली : १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून, नोव्हेंबरपर्यंतच्या पहिल्या ५ महिन्यांत ५.७० कोटी रुपयांचा हा कर बुडविल्याची १६ प्रकरणे देशभरात पकडली गेली. कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
मंत्र्यांनी करबुडवेगिरीची दिलेली अन्य माहिती अशी: एप्रिल ते डिसेंबर २०१७ दरम्यान ९,६६० कोटींचा सेवा कर बुडविल्याची २,९३८ प्रकरणे. चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत ७,२४२ कोटी रुपयांचे केंद्रीय उत्पादन शुल्क बुडविल्याची ६१४ प्रकरणे व ३,९८७ कोटी रुपयांचे सीमाशुल्क बुडविल्याची २६,९६९ प्रकरणे. या सर्व प्रकरणांमध्ये बुडविलेला कर वसूल करण्यासाठी संबंधित विभाग कायद्यानुसार कारवाई करीत आहे, असेही मंत्र्यांनी सांगितले.
५ कोटींचा ‘जीएसटी’ बुडविल्याचे उघड
१ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून, नोव्हेंबरपर्यंतच्या पहिल्या ५ महिन्यांत ५.७० कोटी रुपयांचा हा कर बुडविल्याची १६ प्रकरणे देशभरात पकडली गेली. कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:58 PM2018-02-06T23:58:22+5:302018-02-06T23:58:31+5:30