Join us  

धमाका ऑफर! iPhone 6 केवळ 9 हजार 990 रूपयांत

By admin | Published: January 05, 2017 5:27 PM

अॅपल iPhone 6 खरेदी करायला आवश्यक बजेट नसलेल्यांसाठी एक खास ऑफर आहे. दहा हजारांपेक्षाही कमी किंमतीत तुम्ही आयफोन 6 खरेदी करू शकतात.

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 5 - अॅपल iPhone 6 खरेदी करायला आवश्यक बजेट नसलेल्यांसाठी एक खास ऑफर आहे. दहा हजारांपेक्षाही कमी किंमतीत तुम्ही iPhone 6 खरेदी करू शकतात. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टने एक खास ऑफर आणली आहे, याद्वारे  iPhone 6 चा 16 जीबी मॉडेल  केवळ 9 हजार 990 रूपयांत खरेदी करता येऊ शकतो. 
 
मात्र, हा फोन केवळ ग्रे कलरमध्येच उपलब्ध असणार आहे.  फ्लिपकार्टवर iPhone 6 ची मूळ किंमत  36,990 रूपये इतकी आहे. मात्र, वेबसाइटकडून  22 हजाराची बंपर एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.  ही ऑफर केवळ iPhone 6  16 जीबी  ग्रे कलरमध्येच असणार आहे. याशिवाय 5 हजार रूपयांचं फ्लॅट डिस्काउंटदेखील दिलं जात आहे. तसेच अॅक्सिस बॅंक बझ क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणा-यांना 5 टक्के डिस्काउंट दिलं जात आहे.   एक्स्चेंज ऑफर ही तुमच्याकडे असलेल्या स्मार्टफोनच्या सध्याच्या स्थिती आणि बाजारातील किंमतीनुसार देण्यात येणार आहे. 
(व्हॉट्सअपच्या वादातून तरुणाने ट्रेनखाली केली आत्महत्या)
(व्हॉट्सअपवरील ओळख पडली महागात)
 
iPhone 7 आणि iPhone 7 plus या फोनवरही 20 हजार रूपयांची एक्स्चेंज ऑफर देण्यात आली आहे.