चिन्मय काळे
मुंबई : दक्षिण अमेरिकेतून होणाऱ्या सोयाबीनच्या पेंडीच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्याचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या पेंढच्या निर्यातीत सुमारे ३५ टक्के घट झाली.
सोयाबीन, एरंडी, सूर्यफूल, तांदळचा कोंडा व शेंगदाणा, यापासून खाद्यतेल तयार झाल्यानंतर उरलेल्या चोथ्याला पेंढ (एक्स्ट्रॅक्शन) म्हणतात. ही पेंढ जनावरांसाठी सर्वोत्तम खाद्य असते. त्याची ढेप तयार करून दरवर्षी १५ ते १८ लाख टन निर्यात होते.
३ ते ४ हजार कोटी रुपयांचा हा व्यवसाय असतो. त्यामध्ये सोयबीनच्या ढेपेची निर्यात सर्वाधिक असते. दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये पांढºया डुकरांसाठी (स्वाइन) सोयाबीनची ढेप सर्वात सकस
आहार असतो. २०१६-१७ मध्ये
२०१५-१६ मध्ये या निर्यातीत १३६ टक्के वाढ झाली होती. त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये ही वाढ फक्त २६ टक्के राहिली.
दक्षिण अमेरिकेतील देशांनी स्वत: सोयाबीन पीक घेणे सुरू केले आहे. यामुळेच भारतीय सोयबीनच्या ढेपेची मागणी घटली आहे. यामुळे सोयाबीन बाजार अस्थिर झाला आहे. आता देशांतर्गत सोयाबीन तेलाची मागणी वाढली, तरच सोयाबीनला चांगले दिवस येतील, असे महाराष्टÑ खाद्यतेल महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांचे म्हणणे आहे.
सोयाबीन प्रक्रिया उद्योग हा निर्यातीवरच आधारला आहे. त्याची निर्यात घटली असली, आता देशांतर्गत मागणी वाढते आहे. देशातील पोल्ट्री फार्म्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच वर्षांत विदेशातून मागणी नसली, तरी ढेपेची देशांतर्गत मागणी दुप्पट होईल.
- अतुल चतुर्वेदी, अध्यक्ष, सॉलव्हंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशन
सोयाबीन पेंडीची निर्यात घटली
दक्षिण अमेरिकेतून होणाऱ्या सोयाबीनच्या पेंडीच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्याचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकºयांना बसण्याची शक्यता आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 03:09 AM2018-05-01T03:09:13+5:302018-05-01T03:09:13+5:30