नवी दिल्ली : केंद्र सरकारने उत्पादनावर आधारित प्राेत्साहनपर अनुदान याेजना जाहीर केल्यानंतर ऑटाेमाेबाइल क्षेत्रातील कंपन्यांमध्ये निर्यातवाढीसाठी चढाओढ लागली आहे. या याेजनेत ऑटाेमाेबाइल क्षेत्राला सर्वाधिक लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने नाेव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळीपूर्वी या याेजनेची घाेषणा केली हाेती. त्याअंतर्गत १० क्षेत्रांसाठी उत्पादनावर आधारित अनुदान जाहीर केले हाेते. त्यात वाहननिर्मिती तसेच सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी सर्वाधिक ५७ हजार काेटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी वाहन उद्याेग क्षेत्रात चढाओढ लागली आहे.
निर्यातीसाठी ‘मेक इन इंडिया‘वर भरn लाॅकडाउनमुळे वाहन उद्याेग क्षेत्रात मंदी आली हाेती. परंतु, अलिकडच्या काळात वाहन विक्रीचे आकडे दिलासादायक आहेत. त्यामुळे देशांतर्गत मागणी वाढल्याचे दिसून आले. त्यानंतर आता निर्यातीवर भर देण्याचे सर्वच कंपन्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी उत्पादनही वाढवावे लागणार आहे. देशातील प्रमुख वाहन निर्मिती कंपन्यांमध्ये सद्यस्थितीत उत्पादन वाढविण्याची क्षमता आहे. त्याचा पूर्णपणे वापर करुन घेण्यावर कंपन्यांचा भर राहणार आहे. गेल्या महिनाभरात काही कंपन्यांनी ‘मेक इन इंडिया’ नवीन वाहने लाॅच केली.