Join us

पाच विभागातील निर्यात २५ टक्क्यांनी घटली

By admin | Published: October 02, 2015 11:19 PM

मंदीच्या वातावरणात आॅगस्टमध्ये अभियांत्रिकी, पेट्रोलियम, रत्न आणि दागिने, कपडा आणि औषधी या पाच प्रमुख विभागात देशाची निर्यात २५ टक्क्यांनी घटून १३.३३ अब्ज डॉलर झाली.

नवी दिल्ली : मंदीच्या वातावरणात आॅगस्टमध्ये अभियांत्रिकी, पेट्रोलियम, रत्न आणि दागिने, कपडा आणि औषधी या पाच प्रमुख विभागात देशाची निर्यात २५ टक्क्यांनी घटून १३.३३ अब्ज डॉलर झाली.२0१४-१५ या काळात देशाच्या एकूण निर्यातीपैकी या पाच विभागांच्या निर्यातीचे योगदान ६५ टक्के राहिले. गेल्या आॅगस्टमध्ये या पाच विभागांतून १७.७९ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. वाणिज्य मंत्रालयाने याबाबतीत अस्थायी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, पेट्रोलियम, कपडा या क्षेत्रात निर्यात घटली आहे. रत्न, दागिने विभागात २.६६ टक्क्यांनी तर औषधी विभागात निर्यात किरकोळ वाढली. २0१४-१५ मध्ये या काळात २0२.१५ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. गेल्या वित्तीय वर्षात देशाची एकूण निर्यात ३१0.५ अब्ज डॉलरची झाली होती. भारतीय निर्यातदारांची संघटना ‘फियो’ने म्हटले आहे की, हे श्रमकेंद्रित विभाग असून, या विभागातील निर्यात घसरण थांबविण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. निर्यात घटल्याने वाणिज्य मंत्रालयाने निर्यातदारांची ७ आॅक्टोबर रोजी बैठक बोलावली आहे.भारताने २0२0 पर्यंत वस्तू आणि सेवानिर्यात ९00 अब्ज डॉलर करण्याचे व जागतिक निर्यातीत देशाची भागीदारी २ टक्क्यांवरून वाढवून ३.५ टक्के करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)