Join us  

जिओ प्राइम यूजर्सला देणार 120 जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा- रिपोर्ट

By admin | Published: March 27, 2017 5:23 PM

अल्पावधीतच ग्राहकप्रिय झालेल्या रिलायन्स जिओनं प्राइम यूजर्ससाठी नवा जबरदस्त प्लॅन आणला आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 27 - अल्पावधीतच ग्राहकप्रिय झालेल्या रिलायन्स जिओनं प्राइम यूजर्ससाठी नवा जबरदस्त प्लॅन आणला आहे. 31 मार्चनंतर जिओची मोफत सुविधा समाप्त होणार असून, ग्राहकाला प्राइम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनं Buy one get one  ही नवी ऑफर दिली आहे. जिओच्या वापरकर्त्यानं 149 रुपये आणि त्याहून जास्त पैशांचा रिचार्ज केल्यास त्याला याचा लाभ मिळणार आहे. ऑफरनुसार कंपनीनं 303 रुपयांचं रिचार्ज केल्यास 5 जीबीपर्यंत अतिरिक्त 4G मोफत डेटा मिळणार आहे. तर 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त 10 जीबीपर्यंत मोफत डेटा मिळणार आहे. जिओच्या नव्या प्लॅननुसार वर्षंभरापर्यंत तुम्हाला मोफत डेटा मिळू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला 10 जीबी 12 महिन्यांसाठी म्हणजेच 120 जीबी अतिरिक्त डेटा मोफत मिळणार आहे. मात्र हा 120 जीबीचा अतिरिक्त डेटा मिळवण्यासाठी तुम्हाला 31 मार्चपूर्वी रिचार्ज करावं लागणार आहे, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कसा मिळवाल अतिरिक्त मोफत डेटा जिओच्या 303 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला वर्षभरासाठी 60 जीबी अतिरिक्त फ्री डेटा मिळणार आहे. तर दुसरीकडे 499च्या प्लॅनवर 12 महिन्यांसाठी 120 जीबी मोफत डेटा मिळणार आहेत. मात्र हा डेटा मिळवण्यासाठी तुम्हाला वर्षभराचाच एकदम रिचार्ज करावा लागणार आहे. तुम्ही जर 303 रुपयांचा प्लॅन घेतलात तर तुम्हाला वर्षभरासाठी 3636 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. त्यात तुम्हाला महिन्याभरासाठी 28 जीबीचा डेटा मिळणार असून, 5 जीबीचा अतिरिक्त डेटा मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही 60 जीबी मोफत डेटा मिळवू शकता. त्याचप्रमाणे 499च्या प्लॅन घेणा-या यूजर्सला 12 महिन्यांसाठी 5,988 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. त्यात त्यांना 120 जीबीचा मोफत डेटा मिळणार आहे. हा डेटा प्रत्येक महिन्याला 10 जीबीच्या स्वरूपात मिळणार आहे. कॅशबॅक ऑफर गेल्या काही दिवसांपूर्वीच 99 रुपयांचा भार हलका व्हावा यासाठी आता कंपनीनं आपल्या ग्राहकांना एक नवी कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार जिओ वापरकर्त्याला मोफत सब्सक्रिप्शन मिळू शकतं. रिलायन्स जिओच्या JIO MONEY अ‍ॅपच्या ऑफरमध्ये तुम्हाला हा फायदा मिळणार आहे. जिओनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. जिओ मनीवरून रिचार्ज केल्यास यूजर्सला प्रत्येक रिचार्जवर 50 रुपये कॅशबॅक मिळेल. तर प्राईम मेंबरशिपसाठी यूजर्सला 99 रुपये सब्सक्रिप्शन फी आणि 303 रुपये दर महिना शुल्क द्यावं लागणार आहे. मात्र जर वापरकर्त्यानं 99 रुपयांची मेंबरशिप आणि 303 रुपयांचं टेरिफ रिचार्ज केल्यास या दोन रिचार्जवर (50+50) असं 100 रुपयांचं कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही भरलेले 100 रुपये तुम्हाला परत मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही भरलेलं 99 रुपयांचं मेंबरशिप सब्सक्रिप्शन कॅशबॅकच्या माध्यमातून पुन्हा तुम्हालाच मिळणार आहे. ही कॅशबॅक ऑफर असल्यानं तुम्हाला पहिले रिचार्ज करावं लागणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत तुम्हाला कॅशबॅक मिळेल. कंपनीची ही ऑफर यूजर्ससाठी फायद्याची ठरू शकते.