लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारचे भीम हे अॅप कॅशलेस आणि मोबाइलद्वारे व्यवहार करण्यासाठी वापरणाºयांना एक आनंदाची बातमी आहे. हे भीम अॅप तुम्ही १५ आॅगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून वापरल्यास कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे. नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन आॅफ इंडिया (एनपीसीआई) चे व्यवस्थापकीय संचालक सीईओ एपी होटा यांनी १५ आॅगस्टपासून भीम अॅपच्या वापरकर्त्यांना कॅशबॅकचा प्रस्ताव असल्याचे सांगितले.
हे अॅप एनपीसीआईने गेल्या वर्षीच्या अखेरीस सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर रोख चलनातील व्यवहार कमी व्हावेत आणि लोकांनी डिजिटल व्यवहार सुरू करावेत, यासाठी डिसेंबरमध्ये या अॅपची घोषणा करण्यात आली होती. या अॅपचा वापर करणाºयांना सध्या १0 ते २५ रुपये इतका कॅशबॅक मिळतो. पण अन्य अॅप त्याहून अधिक कॅशबॅक देतात. त्यामुळे भीमच्या कॅशबॅकमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यास १५ आॅगस्टपूर्वीच संमती मिळण्याची शक्यता आहे. पेटीएम व फोन पे हे दोन पेमेंट अॅप खूप कॅशबॅक देतात. त्याहून अधिक कॅशबॅक दिल्यास लोक भीमकडे वळतील, असे सांगण्यात येते. भीम अॅप डाऊनलोड केलेल्यांची संख्या दीड कोटीच्या वर आहे. मात्र त्यापैकी ४0 लाख लोकच पेमेंटसाठी त्याचा प्रत्यक्ष वापर करतात.
भीम अॅपद्वारे जादा कॅशबॅक
सरकारचे भीम हे अॅप कॅशलेस आणि मोबाइलद्वारे व्यवहार करण्यासाठी वापरणाºयांना एक आनंदाची बातमी आहे. हे भीम अॅप तुम्ही १५ आॅगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून वापरल्यास कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 01:15 AM2017-08-08T01:15:04+5:302017-08-08T01:15:10+5:30