Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘यूपीआय’ला अफाट यश; मास्टर कार्ड, व्हिसा पिछाडीवर

‘यूपीआय’ला अफाट यश; मास्टर कार्ड, व्हिसा पिछाडीवर

भारतीय पेमेंट बाजारात जागतिक पातळीवरील बड्या कंपन्या मास्टर कार्ड आयएनसी आणि व्हिसा आयएन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:01 AM2018-03-27T04:01:02+5:302018-03-27T04:01:02+5:30

भारतीय पेमेंट बाजारात जागतिक पातळीवरील बड्या कंपन्या मास्टर कार्ड आयएनसी आणि व्हिसा आयएन

Extreme achievement for UP; Master Card, Visa Trailing | ‘यूपीआय’ला अफाट यश; मास्टर कार्ड, व्हिसा पिछाडीवर

‘यूपीआय’ला अफाट यश; मास्टर कार्ड, व्हिसा पिछाडीवर

नवी दिल्ली : भारतीय पेमेंट बाजारात जागतिक पातळीवरील बड्या कंपन्या मास्टर कार्ड आयएनसी आणि व्हिसा आयएनसी या बाजारहिस्सा गमावत असून भारतीय बनावटीच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयने अफाट यश मिळविल्याचे ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
यूपीआयमुळे किरकोळ विक्रेते, विमान कंपन्या आणि अन्य संस्थांना थेट ग्राहकांच्या बँक खात्यातून पैसे स्वीकारता येतात. डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाइपमधून होणाऱ्या व्यवहारांच्या अर्ध्या रकमेइतके व्यवहार आता यूपीआयद्वारे होत आहेत.
भारतीय बँकांच्या शिखर संघटनेने यूपीआय इंटरफेसची आॅगस्ट २0१६ मध्ये सुरुवात केली. याउलट मास्टर कार्ड गेल्या तीन दशकांपासून भारतात कार्यरत आहे. यूपीआयने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली आहे.
अमेरिका स्थित फिडेलिटी नॅशनल इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस आयएनसीच्या डिसेंबर २0१७ च्या अहवालात म्हटले आहे की, यूपीआय हे नावीन्यपूर्ण समाधान आहे. यूपीआय स्वीकारले जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याद्वारे ‘रिअल-टाइम’मध्ये आर्थिक देवाण-घेवाण होते. त्यात बाह्य व्यावसायिक अ‍ॅप्लिकेशन्सला थेट गुंफण्यात आले आहे.
फिडेलिटी नॅशनलने जगातील ४0 पेक्षा जास्त देशांच्या पेमेंट व्यवस्थेचा अभ्यास करून हा अहवाल जारी केला आहे. नावीन्य आणि ग्राहक मूल्य याबाबतीत पाच गुण मिळविणारी यूपीआय ही एकमेव सिस्टीम ठरली आहे. चीनच्या इंटरनेट बँकिंग पेमेंट सिस्टीमने २ तर केनियाच्या पेसालिंकने ४ गुण मिळविले आहेत. २४ तास उपलब्धता, व्यवहारपूर्तीची गती व सरकार अथवा नियामकाचे पाठबळ या निकषावर हे गुणांकन केले आहे.
के्रडिट स्यूईस ग्रुप एजीने गेल्या महिन्यातील अहवालानुसार, आगामी पाच वर्षांत भारतातील डिजिटल
पेमेंट बाजारपेठ १ लाख कोटी रुपयांची होणार आहे.
८00 दशलक्ष बँक खाती सध्या जोडलेली असून मोबाइल व्यवहारासाठी तयार आहेत.
अ‍ॅमेझॉन डॉट कॉम आयएनसी आणि जेट एअरवेज इंडिया लिमिटेड यांसारख्या बलाढ्या कंपन्या यूपीआयशी जोडलेल्या आहेत. यूपीआयच्या मदतीने या कंपन्या
थेट ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारीत आहेत. ओला, बिग बाजार आणि
पेमेंट मोबाइल सोल्यूशन्स
यांसारख्या कंपन्याही यूपीआयचा वापर करीत आहेत.

बहुतेक बँकांकडून ‘व्हिसा’ किंवा ‘मास्टर कार्ड’ या विदेशी कंपन्यांचे डेबिट-क्रेडिट कार्ड दिले जातात. ग्राहक या कार्डद्वारे एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करतात, तेव्हा व्यवहाराची तांत्रिक प्रक्रिया विदेशातून होते. ग्राहकांना अधिक शुल्क द्यावे लागते. हे शुल्क कमी होण्यासाठी एनपीसीआयने ‘रुपे’ कार्ड आणले. पण बाजारात व्हिसा आणि मास्टर कार्डची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे.

केंद्र सरकारच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने आणलेल्या ‘रुपे’ कार्डची मागणी वाढविण्यासाठी आता आॅफर्सचा आधार घ्यावा लागत आहे.एनपीसीआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग) कुणाल कलवटिया म्हणाले की, अलीकडेच आम्ही ‘रुपे’चे क्रेडिट कार्ड आणले असून त्याची सध्या १२ बँकांकडून तांत्रिक पडताळणी सुरू आहे. या क्रेडिट कार्डमुळे एनपीसीआयची डिजिटल पेमेंट मोहीम सर्वसमावेशक होईल. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ४०० आॅफर्स देऊ केल्या आहेत.

Web Title: Extreme achievement for UP; Master Card, Visa Trailing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.