नवी दिल्ली : मालमत्ता विकून कर्जे फेडण्यात अपयश आल्यामुळे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स या कंपनीने दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरे जाण्याचे ठरविले आहे.
यासंदर्भात कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, कर्जफेडीसाठी रिलायन्स कम्युनिकेशन्सने २ जून २०१७ रोजी ठरविलेल्या धोरणानुसार त्यानंतरच्या अठरा महिन्यांत किती प्रगती झाली याचा आढावा कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एकाही पैशाचीही कर्जफेड न झाल्याने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडून (एनसीएलटी) होणाऱ्या दिवाळखोरीच्या कारवाईला रिलायन्स कम्युनिकेशन सामोरे जाणार आहे.
राफेल विमाने खरेदी व्यवहारात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स लिमिटेड या कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा फायदा करून दिल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्या वादंगामध्ये आता रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या प्रस्तावित दिवाळखोरी प्रकरणाची भर पडणार आहे.
दिवाळखोरीच्या कारवाईस सामोरे जाणार; अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा निर्धार
मालमत्ता विकून कर्जे फेडण्यात अपयश आल्यामुळे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स या कंपनीने दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरे जाण्याचे ठरविले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 06:25 AM2019-02-02T06:25:22+5:302019-02-02T06:25:46+5:30