मुंबई : आॅनलाइन व्यवसाय करणा-या ई-कॉमर्स कंपन्यांची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. या कंपन्या थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणाचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) केला होता.एफडीआय धोरणानुसार आॅनलाइन व्यवसाय करणाºया कंपन्यांना केवळ ‘बीटूबी’ अर्थात घाऊक व्यापाºयांनाच माल विक्री करण्याचा अधिकार आहे. मात्र सर्वच कंपन्या थेट किरकोळ ग्राहकांना मालाची विक्री करीत आहेत. त्यासाठी त्यांनी विदेशी गुंतवणूक मंडळाचीही परवानगी घेतलेली नाही. शिवाय आॅनलाइन कंपन्यांमुळे किरकोळ व्यापार संकटात आला असून, देशाच्या महसुलाचे व नियमांचे उल्लंघन होत आहे, असे कॅटचे म्हणणे आहे.देशात येणाºया गुंतवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ कार्यरत आहे. या आॅनलाइन कंपन्यांची प्रामुख्याने एफआयपीबीमार्फत केंद्रीय वाणिज्य मंत्रालय चौकशी करीत आहे.निकाल लवकर लागावा-कॅटने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या कंपन्यांची तपासणी व चौकशी सुरू झाली. त्याचे सकारात्मक निकाल लवकर लागावेत, हीच अपेक्षा आहे, असे मत कॅटचे अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
आॅनलाइन कंपन्या अडचणीत, चौकशी झाली सुरू; एफडीआय धोरणाच्या उल्लंघनाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:55 PM