Join us  

फेसबुकनं ११ हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्यानंतर पुन्हा नोकर कपातीची तयारी, आता किती जणांचा कमी करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 1:51 PM

फेसबुकची मूळ कंपनी 'मेटा'नं ११,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढल्यानंतर आता कंपनीनं दुसऱ्या फेरीच्या नोकर कपातीची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

फेसबुकची मूळ कंपनी 'मेटा'नं ११,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढल्यानंतर आता कंपनीनं दुसऱ्या फेरीच्या नोकर कपातीची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. फायनान्शिअल टाईम्समधील वृत्तानुसार, 'मेटा'ने अनेक टीम्सच्या बजेटला अंतिम मंजुरी देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे.

'मेटा'सोबतच, अमेझॉन, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या टेक दिग्गजांनीही सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे मोठ्या प्रमाणात नोकर कपात जाहीर केली आहे. अॅमेझॉनने गेल्या वर्षी १०,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आणि या वर्षाच्या सुरुवातीला कपातीचा अंदाज सुधारून १८,००० इतका केला. Google ने देखील २०२३ ची सुरुवात त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नोकर कपातीसह केली. गुगलनं १२,००० कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, 'मेटा'ने जाहीर केले की 2023 चा खर्च ८९ आणि ९५ बिलियन डॉलर दरम्यान असेल. सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या कालावधीचे वर्णन "कार्यक्षमतेचे वर्ष" असं केलं आहे. बजेट विलंब आणि संभाव्य नोकऱ्या कपातीच्या बातम्यांनी मेटा प्लॅटफॉर्म इंक मधील कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढवली आहे. कंपनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी, तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या अनिश्चिततेमुळे कर्मचार्‍यातील कपातीबद्दल चिंता निर्माण होत आहे.

टॅग्स :मेटाफेसबुक