Lokmat Money > बिझनेस न्यूज > Facebook Live मध्येही घेता येणार ब्रेक?

Facebook Live मध्येही घेता येणार ब्रेक?

स्मार्टफोन हातात घेत आपल्या आयुष्यातल्या अनेक क्षणांचं लाईव्ह चित्रीकरण करत संपूर्ण जगापुढे येणं फेसबुकमुळे सहज शक्य झाले. पण आता त्यावर जाहिरातींचा भडीमार होण्याची शक्यता आहे.

By admin | Published: March 2, 2017 06:25 PM2017-03-02T18:25:35+5:302017-03-02T18:25:35+5:30

स्मार्टफोन हातात घेत आपल्या आयुष्यातल्या अनेक क्षणांचं लाईव्ह चित्रीकरण करत संपूर्ण जगापुढे येणं फेसबुकमुळे सहज शक्य झाले. पण आता त्यावर जाहिरातींचा भडीमार होण्याची शक्यता आहे.

Facebook Live can also take break? | Facebook Live मध्येही घेता येणार ब्रेक?

Facebook Live मध्येही घेता येणार ब्रेक?

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - सोशल मीडियाने आपलं आयुष्य व्यापून टाकलं आहे. जणू माणसाला फुटलेलं ते सहावं इंद्रियच म्हणावे असं. आपण प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. फेसबुक यामध्ये सर्वार्धिक लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी फेसबुकने लाईव्ह हे फिचर सुरु करुन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. स्मार्टफोन हातात घेत आपल्या आयुष्यातल्या अनेक क्षणांचं लाईव्ह चित्रीकरण करत संपूर्ण जगापुढे येणं फेसबुकमुळे सहज शक्य झाले. पण आता त्यावर जाहिरातींचा भडीमार होण्याची शक्यता आहे. सध्या फेसबुक याची चाचणी घेत आहे.

सध्यातरी २००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असणाऱ्या फेसबुक अकाऊंट्स आणि पेजेस् ना ह्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेसबुक लाईव्ह व्हिडिओ सुरू असताना ब्रेक घ्यायचं की नाही याचं स्वातंत्र्य तो व्हिडिओ करत असलेल्या व्यक्तीकडे असेल. व्हिडिओ सुरू झाल्यानंतर पहिली चार मिनिटं ब्रेक घेता येणार नाही. दोन्ही ब्रेकमध्ये कमीत कमी 5 मिनीटाचे अंतर बंधनकारक केले आहे. सध्या अमेरिकेतल्या काही लोकप्रिय फेसबुक लाईव्ह कर्त्यांना त्यांच्या व्हिडिओदरम्यान ब्रेक घेण्यासाठी टेस्टिंगची सुविधा फेसबुकने उपलब्ध करून दिली आहे. जास्तीत-जास्त 30 सेकंदाची जाहिरात यावेळी येऊ शकते. 

आपण टिव्ही पाहत असताना किंव्हा रेडिओ ऐकत असताना ब्रेक के बाद हे शब्द आपल्या कानावर पडतात, सोशल मीडियावर किंवा वर्तमान पत्र वाचताना जाहिरात समोर येतेच. यावेळी आपन चॅनेल बदलून किंवा स्क्रोल करुन जाहिरातीतून सुटका मिळवतो पण ज्यावेळी फेसबुक लाईव्हवर अशा प्रकारच्या जाहिराती येतील त्यावेळी फेसबुक लाईव्ह कंटाळवणं होऊ शकतं. सध्या जरी याची मर्यादा प्रत्येक पाच मिनीटाला 30 सेकंद असली तरी फेसबुक लाईव्हची लोकप्रियता पाहता भविष्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  

Web Title: Facebook Live can also take break?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.