Join us

फेसबुककडून युजर्सचा डाटा बड्या कंपन्यांना बहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 7:20 AM

न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले की, फेसबुकने नेटफ्लिक्स व स्पॉटीफाय या कंपन्यांना वापरकर्त्यांचे खासगी संदेश वाचण्याची परवानगी दिली आहे.

न्यूयॉर्क : फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांचा खासगी डाटा मायक्रोसॉफ्ट व अ‍ॅमेझॉनसारख्या बड्या कंपन्यांना उपलब्ध करून दिल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे. मित्रांना पाठविलेले खासगी संदेश व संपर्कविषयक माहितीचाही या डाटात समावेश आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले की, फेसबुकने नेटफ्लिक्स व स्पॉटीफाय या कंपन्यांना वापरकर्त्यांचे खासगी संदेश वाचण्याची परवानगी दिली आहे. मायक्रोसॉफ्टचे सर्च इंजिन ‘बिंग’ला फेसबुक वापरकर्त्यांच्या मित्रांची नावे विनापरवानगी पाहण्याची सोय केली आहे. अ‍ॅमेझॉन आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फेसबुक वापरकर्त्यांची नावे आणि संपर्कविषयक माहिती पाहू शकते. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका डाटा फुटी घोटाळा उघडकीस आल्यापासून फेसबुक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मार्चमध्ये उघडकीस आलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश राजकीय सल्लागार संस्था केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने ८७ दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांचा डाटा विनापरवानगी वापरला होता. फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांचा डाटा १५० पेक्षा जास्त कंपन्यांना दिला आहे. यातील बहुतांश कंपन्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. आॅनलाईन रिटेलर्स व मनोरंजन वेबसाईटस् तसेच वाहन उत्पादक व माध्यम संस्था यांचा त्यात समावेश आहे. कराराचा केला भंग२०११ मध्ये फेडरल ट्रेड कमिशनसोबत (एफटीसी) केलेल्या करारानुसार, विनापरवानगी डाटा सामायिक करणार नसल्याचे फेसबुकने मान्य केले होते. हा करार फेसबुकने मोडला आहे. एफटीसीच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या डेव्हिड व्लाडेक म्हणाले की, वापरकर्त्यांना न कळवताच त्यांचा डाटा वापरण्याची परवानगी तिसºया पक्षाला फेसबुककडून दिली जात आहे.

टॅग्स :फेसबुकव्यवसाय