Join us

... त्यामुळे देशातील 20 कोटी युजर्संसाठी 'फेसबुक भारताच्या संपर्कात'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 6:47 AM

आयटी मंत्रालयाला दिला तपशील; परिणामांचा आढावा घेणे सुरूच

नवी दिल्ली : अलीकडे झालेल्या डाटा फुटीची प्राथमिक माहिती देण्यासाठी आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत, असे फेसबुकने म्हटले आहे. या डाटा फुटीचा ५0 दशलक्ष फेसबुक खातेधारकांना फटका बसला होता, असे मानले जाते. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाने अमेरिकास्थित फेसबुकला नोटीस बजावून डाटा फुटीचा भारतातील किती फेसबुक वापरकर्त्यांना फटका बसला याची माहिती सादर करण्यास सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर फेसबुकच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेच्या एका ई-मेलला पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे की, आम्ही २८ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या डाटा फुटीची प्राथमिक माहिती सादर करण्यासाठी भारत सरकारच्या सतत संपर्कात आहोत. वास्तविक डाटा फुटीचा भारतीय फेसबुक वापरकर्त्यांवर झालेल्या परिणामांचा आम्ही अजूनही आढावा घेत आहोत. हा तपास पूर्ण केल्यानंतर आणखी माहिती आम्ही जारी करणार आहोत.केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, या मुद्यावर फेसबुक या कंपनीने मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात तपशील दिला आहे. मात्र यात काय आहे, हे सांंगण्यास मात्र सूत्रांनी नकार दिला. फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले की, डाटा फुटीच्या मुद्यावर आम्ही तात्काळ कारवाई केली आहे. आमच्या सर्व वापरकर्त्यांना, जाहिरातदारांना आम्ही माहिती दिली आहे. त्यांची खाती सुरक्षित करण्यात आली आहेत.देशात २० कोटी युजर्सभारतात फेसबुकचे २00 दशलक्ष वापरकर्ते आहेत. फेसबुकचा जगातील सर्वांत मोठा वापरकर्ता आधार भारतातच आहे. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग म्हणाले की, २५ सप्टेंबरला फेसबुकवर हल्ला झाल्याचे लक्षात आले. हल्लेखोरांनी फेसबुकच्या कमजोर दुव्यांना लक्ष्य केले असून, ५0 दशलक्ष खात्यांना फटका बसला. 

टॅग्स :फेसबुकभारत