Lokmat Money > बिझनेस न्यूज > फेसबुक भारतातल्या १०० गावांना देणार वाय फायची सुविधा

फेसबुक भारतातल्या १०० गावांना देणार वाय फायची सुविधा

देशामध्ये डिजिटल क्रांतीत सहभागी होण्यासाठी फेसबुक आणि बीएसएनल ग्रामीण भारतामध्ये १०० ठिकाणी वाय फाय यंत्रणा उभी करणार आहेत

By admin | Published: October 31, 2015 02:59 PM2015-10-31T14:59:12+5:302015-10-31T14:59:12+5:30

देशामध्ये डिजिटल क्रांतीत सहभागी होण्यासाठी फेसबुक आणि बीएसएनल ग्रामीण भारतामध्ये १०० ठिकाणी वाय फाय यंत्रणा उभी करणार आहेत

Facebook will provide Wi-Fi facility to 100 villages in India | फेसबुक भारतातल्या १०० गावांना देणार वाय फायची सुविधा

फेसबुक भारतातल्या १०० गावांना देणार वाय फायची सुविधा

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - देशामध्ये डिजिटल क्रांतीत सहभागी होण्यासाठी फेसबुक आणि बीएसएनल ग्रामीण भारतामध्ये १०० ठिकाणी वाय फाय यंत्रणा उभी करणार आहेत. बीएसएनएनकडून बँडविड्थ विकत घेण्यासाठी फेसबुक दरवर्षी पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. वायफाय उपलब्ध करून देण्यासाठी लागणा-या सामग्रीसाठीही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे वृत्त बीएसएनलच्या अधिका-यांच्या हवाल्याने इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.
फेसबुकने १०० गावांची निवड केलेली असून प्रत्येक गावासाठी वर्षाला ५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 
आत्तापर्यंत चाचणीसाठी दक्षिण व पश्चिम भारतातल्या २५ गावांची निवड करण्यात आली आहे. येत्या दोन वर्षात ही संख्या वाढवण्यात येणार आहे. ग्राहकांना पहिल्या अर्ध्या तासासाठी वाय फाय मोफत मिळेल आणि एकाचवेळी साधारणपणे २००० ग्राहक ही सुविधा वापरू शकतिल असे बीएसएनएलच्या अधिका-यांनी सांगितले. 
बीएसएनलने स्वत: आत्तापर्यंत ४५० वाय फाय हॉटस्पॉट उभारले असून मार्च २०१६ पर्यंत ही संख्या २,५०० करण्याचे उद्दिष्ट्य आहे. डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणानुसार वाय फायला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे बीएसएनलच्या अधिका-यांनी सांगितले आहे.

Web Title: Facebook will provide Wi-Fi facility to 100 villages in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.