नवी दिल्ली : सोशल नेटवर्क वेबसाईट फेसबुक देशाच्या ग्रामीण भागात १०० वायफाय साईटसाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) भागीदारीत दरवर्षी पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की, फेसबुकने दक्षिण व पश्चिम भारतातील गावांत १०० वायफाय हॉटस्पॉट निर्माण करण्यासाठी आमच्याशी भागीदारी केली आहे. ते प्रत्येक हॉटस्पॉटसाठी दरवर्षी पाच लाख रुपये बीएसएनएलला बँडविड्थमध्ये अदा करतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बीएसएनएलशी फेसबुकचा करार
By admin | Published: November 02, 2015 12:07 AM