फेसबूकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाचे (Meta) सीईओ आणि फाउंडर मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना मोठे यश मिळाले आहे. मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. केवळ एकाच दिवसात मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत 10.2 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. फेसबुकच्या पॅरेंट कंपनीच्या जबरदस्त परिणामांनंतर, श्रीमंत लोकांच्या यादीत मार्क झुकरबर्ग यांची रँकिंग वाढली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. याच बरोबर, मार्क झुकरबर्ग यांची संपत्तीही रात्रीतूनच 10 अब्ज डॉलरहून अधिक झाली आहे. ते ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index Report ) मध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकत 12व्या स्थानावर आले आहेत.
मुकेश अंबानींना बसला फटका - मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत गुरुवारी 10.2 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तसेच, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्री के चेअरमन मुकेश अंबानी यांना 4.7 अब्ज डॉलरचा झटका बसला आहे. अंबानी यांना बसलेल्या या झटक्यानंतर, मार्क झुकरबर्ग यांनी त्यांना श्रीमंत लोकांच्या यातीत एका पायरीने खाली ढकलले आहे. ब्लूमबर्गच्या सध्याच्या बिलेनिअर लिस्टमध्ये मार्क झुकरबर्ग 87.3 अब्ज डॉलरसह 12व्या क्रमांकावर आहे. तर मुकेश अंबानी 82.4 अब्ज डॉलर्ससह 13व्या क्रमांकावर गेले आहेत. महत्वाचे म्हणजे, या वर्षात झुकरबर्ग यांच्या सपत्तीत तब्बल 41.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये मार्क यांच्याकडे, 34.6 अब्ज डॉलर एवढी संपत्ती होती. आज ती 87.3 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
अमेरिकन उद्योगपतींचा जलवा -ब्ल्यूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधिशांच्या यादीत अमेरिकन उद्योगपतीच अधिक आहेत. टॉप 10 अब्जाधिशांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर आहेत. तर एलन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अॅमेझॉनचे जेफ बेजोस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर, बिल गेट्स, वॉरेन बफे, लॅरी एलिशन , स्टिव्ह वॉल्मर , लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांचा क्रमांक लागतो. तर दहाव्या क्रमांकावर फ्रान्सचे Francoise Bettencourt Meyers आहेत. अर्थात पहिल्या आणि दहाव्या क्रमांकावर फ्रान्सचे उद्योगपती आहेत. तर उरलेले 8 जण एकट्या अमेरिकेचे आहेत.