Join us

मेक इन इंडिया अभियानासाठी इन्व्हेस्ट इंडियाचे सुविधा कक्ष

By admin | Published: September 27, 2014 5:09 AM

मेक इन इंडिया अर्थात भारतात तयार करा अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाने उद्योग संघटना फिक्कीच्या मुख्यालयात एक विशेष कक्ष सुरू केला आहे

नवी दिल्ली : मेक इन इंडिया अर्थात भारतात तयार करा अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाने उद्योग संघटना फिक्कीच्या मुख्यालयात एक विशेष कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष गुंतवणुकीशी संबंधित सर्व प्रकारच्या चौकशीसाठी मदत करील. गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्यासही साह्य करेल.गुंतवणुकीबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती प्रश्न पाठवून मेकइनइंडिया.कॉम या संकेतस्थळावर त्याचे उत्तर दिले जाणार आहे. या संकेतस्थळाचे देशाला उत्पादन क्षेत्राचे जागतिक केंद्र म्हणून नावारूपाला आणण्यासाठी काल लोकार्पण करण्यात आले. इन्व्हेस्ट इंडिया हा औद्योगिक धोरण व संवर्धन विभाग, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, राज्य सरकार व उद्योग संघटना फिक्की यादरम्यान विना नफा तत्त्वावर चालविला जाणारा संयुक्त उपक्रम आहे. २०१० मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. देशात केंद्रित व व्यापक स्वरूपात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाची गुंतवणूक संवर्धन संस्था म्हणून स्थापना करण्यात आली होती. सरकारने गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी अगोदरच अर्थ मंत्रालय व राज्य सरकार यांच्यात नोडल एजन्सीची स्थापना केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)