नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून अडचणीमध्ये असलेल्या वाहन उद्योगाला कोरोनाच्या संकटाचा जबर फटका बसण्याची चिन्हे असून डीलरच्या स्तरावरील अनेक नोकºया कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वाहन डीलर्सची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) वरील भीती व्यक्त केली असून, मागील वर्षापेक्षा यंदा परिस्थिती आणखी कठीण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.मागील वर्षामध्ये वाहनांच्या विक्रीमध्ये मोठी घट झाल्यामुळे सुमारे दोन लाख लोकांना आपला रोजगार गमवावा लागला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहन विक्रीचे शोरूम सुमारे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद राहिले आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत वाहन डीलरकडे नोकऱ्यांची काय स्थिती राहील, याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकेल, असे फाडाच्या एका अधिकाºयाने सांगितले.फाडातर्फे लवकरच सर्व वाहन डीलरकडे एक सर्वेक्षण करण्यात येईल. या सर्वेक्षणामधून आगामी काळात डीलरकडील नोकºयांची स्थिती काय राहील, याचा अंदाज येण्याची शक्यता आहे. देशातील मध्यम व उच्च मध्यम वर्गाला कोरोनाच्या संकटामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे वाहन खरेदीबाबत शंका वाढत आहे.वाहनांच्या मागणीमध्ये सुधारणा न झाल्यास वाहन डीलर्सकडील नोकºयांमध्ये कपात होणार आहे. यावेळी सन २०१९पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये नोकर कपात होण्याची भीती वाटत आहे. मागील वर्षीच्या मे आणि जून महिन्यामध्ये देशभरातील वाहन उद्योगांच्या डीलरकडील सुमारे दोन लाख व्यक्तींना नोकºया गमवाव्या लागल्या आहेत. यंदा यापेक्षा गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. चालू महिन्याच्या अखेरीस होणाºया एकूण नुकसानीचा अंदाज येणार आहे.- हर्षराज काळे, राष्ट्रीय अध्यक्ष, फाडा
वाहन उद्योगातील नोकऱ्यांमध्ये होऊ शकेल मोठी कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 2:25 AM