Lokmat Money > बिझनेस न्यूज > विदर्भात कापसाचे करावे लागणार फेरनियोजन!

विदर्भात कापसाचे करावे लागणार फेरनियोजन!

जुलै महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मूग, उडीद पिकाची सलग पेरणी आता शक्य नसल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी

By admin | Published: July 13, 2015 12:11 AM2015-07-13T00:11:40+5:302015-07-13T00:11:40+5:30

जुलै महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मूग, उडीद पिकाची सलग पेरणी आता शक्य नसल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी

Fadnage to be done in cotton in Vidarbha! | विदर्भात कापसाचे करावे लागणार फेरनियोजन!

विदर्भात कापसाचे करावे लागणार फेरनियोजन!

अकोला : जुलै महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मूग, उडीद पिकाची सलग पेरणी आता शक्य नसल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फेरपेरणीचे आपत्कालीन नियोजन केले आहे. १५ जुलैपर्यंत पाऊस आलाच नाही तर मात्र कपाशी पेरणीचेदेखील फेरनियोजन करावे लागणार आहे.
खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भात आदी पिकांची शेतकऱ्यांनी जूनमध्ये पेरणी केली; परंतु पावसाने दडी मारली आहे. यामुळे कृषी विद्यापीठाने जुलै महिन्याचे पिकांचे नियोजन केले आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी याच आठवड्यात होणे आवश्यक होते. तथापि पाऊस नसल्यामुळे मूग, उडीद सलग पेरणी आता शक्य नसल्याने एवढ्यात पाऊस आला तरच आंतरपीक म्हणून पेरणी करता येईल. त्यासाठी मात्र २० टक्के बियाणे अधिक वापरावे लागणार आहे. कापूस पेरणी करण्यासाठी खोल व मध्यम खोल, काळी जमीन कपाशीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी लवकर परिपक्व होणारे अमेरिकन अथवा देशी कापूस यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासाठी मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून आंतरभाव करावा. थोड्या-थोड्या क्षेत्रावर वरील आंतरपिके घ्यावीत.

Web Title: Fadnage to be done in cotton in Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.