Penalty on Emami Limited : भारतीयांचा मूळ रंग हा कृष्णवर्णीय मानला जातो. मात्र, चित्रपट, मालिका आणि जाहिरातींच्या माध्यमातून गोऱ्या वर्णाला गेल्या काही वर्षात अतिमहत्त्व आलं आहे. यामागे मोठमोठ्या सौंदर्य प्रसाधन विकणाऱ्या कंपन्यांचाही हात आहे. चेहरा गोरा किंवा उजळ करण्याचा दावा करणारी अनेक उत्पादने आजही बाजारात पाहायला मिळतात. मात्र, हा दावा करणे एका कंपनीला चांगलेच महागात पडलं आहे. एका ग्राहकाने अवघ्या ७९ रुपयांची क्रीम खरेदी केली. कंपनीने दावा केल्याप्रमाणे त्याचा चेहरा गोरा झाला नाही. त्यानंतर त्याने कंपनीला कोर्टात खेचलं. न्यायालयाने कंपनीची जाहिरात दिशाभूल करणारी असल्याचे मानले आणि दावे चुकीचा सिद्ध झाल्याने कंपनीला १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. आता कंपनी हे पैसे ग्राहकाला देणार आहे.
दिल्लीस्थित ग्राहक मंचाने हा निर्णय दिला आहे. ग्राहक मंचाने अनुचित व्यापार पद्धतींसाठी सौंदर्यप्रसाधन कंपनी इमामी लिमिटेडला १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इमामीची 'फेअरनेस क्रीम'ची जाहिरात दिशाभूल करणारी आणि फसवी असल्याचा आरोप एका ग्राहकाने केला होता. 'मध्य दिल्ली जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग' इमामी लिमिटेड विरुद्ध त्यांच्या उत्पादन 'फेअर अँड हँडसम क्रीम'च्या अनुचित व्यापार पद्धतींबद्दल तक्रारीवर सुनावणी करत होता.
कंपनीविरुद्ध काय तक्रार होतीतक्रारदाराने सांगितले की, त्यांनी २०१३ मध्ये ही क्रीम ७९ रुपयांना विकत घेतली होती. परंतु, कंपनीने दावा केल्याप्रमाने या क्रीमता काहीही परिणाम झाला नाही. फोरमचे अध्यक्ष इंदर जीत सिंग आणि सदस्य रश्मी बन्सल यांनी ९ डिसेंबर रोजी आदेश दिला. कंपनीने क्रिमवर असलेल्या लेबलमधून जो दावा केला आहे, त्याचे परिणाम प्रत्यक्षात मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे मंचाने निर्णयात सांगितले.
कंपनीचा दावा काय होता?कंपनीने उत्पादनाच्या पॅकेजिंग आणि लेबलवर, जलद गोरेपणा येण्यासाठी दिवसातून दोनदा चेहऱ्यावर आणि मानेवर क्लींजिंग करा, असे लिहिले होते. युक्तीवादात इमामी लिमिटेडचे म्हणणे आहे, की तक्रारदार हे सिद्ध करू शकत नाही की त्याने सूचनांनुसार क्रीम वापरली आहे. त्यामुळे उत्पादनात कोणताही दोष नाही. मात्र, उत्पादन वापरल्यानंतर तक्रारदाराची त्वचा गोरी झाली की नाही याचा निष्कर्ष काढता येईल असे काहीही रेकॉर्डवर नाही, असेही मंचाने म्हटले आहे.
कंपनीने ग्राहकांवर टाकली जबाबदारी कंपनीने लेखी निवेदनात ही जबाबदारी झटकल्याचे पाहायला मिळाले. कंपनीने दावा केला, की उत्पादनामधून अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी उत्पादनाचा योग्य वापर आणि पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी राहणीमान यासारख्या अनेक घटकांची आवश्यकता असते. मंचाने म्हटले की, ‘उत्पादनाच्या पॅकेजिंग आणि लेबलिंगवर अशा अटींचा उल्लेख केलेला नाही. अंतिम लेखी युक्तिवादांमधील आणखी एक मुद्दा असा आहे की उत्पादन १६-३५ वयोगटातील सामान्य तरुण पुरुषांसाठी (आजारी लोक नाही) आहे. आजारी व्यक्ती म्हणजे काय? ही अतिरिक्त आवश्यकता पॅकेजिंगवर देखील नमूद केलेली नाही.