Fake Amul Ghee Packet: भारतीय डेअरी ब्रँड अमूलनं बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट अमूल तूपाबाबत ग्राहकांना सावध केलं आहे. यासाठी अमूलकडून एक पब्लिक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. काही बेईमान एजंट बनावट तूप डिस्ट्रिब्युट करत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. सध्या हे एक लिटरच्या रिफिल पॅकमध्ये उपलब्ध करून दिलं जात आहे आणि तीन वर्षांपेक्षाही अधिक कालावधीपासून कंपनीनं याचं उत्पादन केलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
१ लिटरचं पॅकचं उत्पादनच नाही
कंपनीनं तुपाच्या १ लिटरचं पॅकचं उत्पादन गेल्या तीन वर्षांपासून केलेलं नाही. अशामध्ये अमूलचं १ लिटरच्या पॅकिंगमध्ये विकलं जाणारं तूप बनावट असू शकतं. तूप खरेदी करण्यापूर्वी त्याचं पॅकेजिंग तपासून घेतलं पाहिजे, असंही अमूलनं म्हटलं. बनावट आणि खरं अमूल तूप कसं ओळखायचं याबाबत अमूलनं काय म्हटलं पाहूया.
Issued in Public Interest by Amul pic.twitter.com/1dsJw4aTcW
— Amul.coop (@Amul_Coop) October 22, 2024
असं ओळखू शकता
"बनावट उत्पादनांपासून बचाव करण्यासाठी ड्युप्लिकेशन प्रूफ कार्टन पॅकची सुरुवात केलेली आहे. हे पॅकेजिंग अमूलच्या आयएसओ-प्रमाणित डेअरिंमध्ये असेप्टिक फिलिंग तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलं जातं. या तंत्रज्ञानामुळे क्वालिटी स्टँडर्ड सुनिश्चित केले जातात. अशात ग्राहकांनी तूप खरेदी करण्यापूर्वी एकदा पॅकेजिंग तपासून घ्यावं. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या तक्रारींसाठी 18002583333 नंबरवर कॉल करू शकता," असं अमूलनं म्हटलंय.