तुमचे YONO खाते बंद झाले आहे, असा मेसेज तुम्हाला तुमच्या फोनवर एसबीआय (SBI) कडून मेसेज आला आहे का?... आला असेल तर हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांना असा कोणताही मेसेज पाठवलेला नाही. जर तुम्हाला देखील हा मेसेज प्राप्त झाला असेल तर सावध व्हा. पीआयबी (PIB) फॅक्ट चेकने याबाबत माहिती दिली आहे. (state bank of india is not sending message that your yono account is block fact check fake message alert)
काय म्हटले आहे मेसेजमध्ये ?पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करत म्हटले आहे की, एक बनावट मेसेज समोर येत आहे. जो एसबीआयचा असल्याचा दावा केला जात आहे. आपले योनो खाते बंद केले गेले आहे, असा दावा करत आहे. तसेच, पीआयबीने त्याच्या ट्विटर हँडलवर मेसेजचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. या मेसेजमध्ये योनो खाते बंद केले गेले आहे. तुम्हाला तुमचे पॅन कार्ड अपडेट करून नेट बँकिंगमध्ये लॉगिन करण्यास सांगितले जाते. त्यात एक लिंकही शेअर करण्यात आली आहे, ज्यावर युजरला क्लिक करावे लागेल.
दरम्यान, ही लिंक पूर्णपणे बनावट आहे. त्यामुळे त्यावर अजिबात क्लिक करू नका आणि तुमची कोणतीही बँकिंग किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर करू नका. सायबर गुन्हेगारांसाठी तुम्हाला फसवणुकीचा बळी बनवण्याचा हा एक मार्ग असू शकतो. त्यामुळे त्यात तुम्ही अजिबात पडू नका. तसेच तुमचे YONO खाते सक्रिय करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क विचारल्यास असे कोणतेही शुल्क भरू नका.
बँकिंग डिटेल्स शेअर करू नकाया व्यतिरिक्त पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, ईमेल किंवा एसएमएसला कधीही प्रतिसाद देऊ नका, जे तुम्हाला तुमचे बँकिंग डिटेल्स शेअर करण्यास सांगतील. यासह पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले आहे की, जर तुम्हाला असाच मेसेज आला असेल तर लगेच त्याची माहिती report.phishing@sbi.co.in वर पाठवा.
आजकाल सायबर गुन्ह्यांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोना महामारीदरम्यान बहुतेक लोक बँकिंगशी संबंधित काम ऑनलाईन करतात. अशा परिस्थितीत सायबर गुन्हेगार याचा गैरफायदा घेत आहेत. आणि लोकांना फसवणुकीचा बळी बनवणे.