नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव मागणीअभावी ५० रुपयांच्या घसरणीसह २७,८३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तथापि, आभूषण निर्माते व औद्योगिक संस्थांच्या मर्यादित मागणीमुळे चांदीचा भाव ३८,१०० रुपयांवर कायम राहिला.व्यापाऱ्यांनी सांगितले की, मुख्यत: जागतिक बाजारातील घसरणीचा स्थानिक सराफ्याला फटका बसला. सध्याच्या पातळीवर आभूषण निर्माते व रिटेलर्स यांची मागणी घटल्याने ही घसरण नोंदली गेली आहे. न्यूयॉर्क बाजारात सोन्याचा भाव ०.४० टक्क्यांनी घटून १,२३३.७० डॉलर प्रतिऔंस झाला. दुसरीकडे आभूषण निर्मात्यांच्या मागणीने तयार चांदीचा भाव ३८,१०० रुपयांवर कायम राहिला, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ६० रुपयांनी घटून ३७,६५५ रुपये प्रतिकिलोवर आला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी कोसळून खरेदीसाठी ६२,००० रुपये व विक्रीसाठी ६३,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या भावात घसरणीचा कल
By admin | Published: February 12, 2015 12:59 AM