Lokmat Money > बिझनेस न्यूज > ATM/Debit कार्ड फ्रॉडमध्ये घसरण, पण इंटरनेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड फ्रॉड वाढले; अर्थमंत्र्यांची माहिती

ATM/Debit कार्ड फ्रॉडमध्ये घसरण, पण इंटरनेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड फ्रॉड वाढले; अर्थमंत्र्यांची माहिती

अर्छमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली माहिती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 05:29 PM2022-02-08T17:29:04+5:302022-02-08T17:29:28+5:30

अर्छमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली माहिती.

Fall in ATM Debit card fraud while internet banking and credit card fraud increased Information of Finance Minister nirmala sitharaman budget session 2022 | ATM/Debit कार्ड फ्रॉडमध्ये घसरण, पण इंटरनेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड फ्रॉड वाढले; अर्थमंत्र्यांची माहिती

ATM/Debit कार्ड फ्रॉडमध्ये घसरण, पण इंटरनेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड फ्रॉड वाढले; अर्थमंत्र्यांची माहिती

विविध लोकपाल योजनांतर्गत (Ombudsman scheme) फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank Of India) दिली. 2020-21 या आर्थिक वर्षात अशा फसवणुकीची प्रकरणे 1 लाख 45 हजार 309 इतकी वाढली, तर 2019-20 या आर्थिक वर्षात फसवणुकीची एकूण प्रकरणे 1 लाख 35 हजार 448 इतकी होती. अर्थमंत्री निर्मला सितारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी राज्यसभेत ही माहिती दिली. 

रिझर्व्ह बँकेने एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग फसवणुकीबाबतही आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, एटीएम/डेबिट कार्डच्या फसवणुकीबद्दल बोलताना, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, 2019-20 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 13 टक्क्यांनी घट झाली आहे. मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या फसवणुकीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या फसवणुकीत 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी सदनाला दिली.

रिझर्व्ह बँकेने 6 जुलै 2017 रोजी एक परिपत्रक जारी केले होते. या परिपत्रकात, अनधिकृत डिजिटल फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली होती. यामध्ये ग्राहकांना डिजिटल फसवणुकीपासून कसे वाचवता येईल हेही सांगण्यात आले. रिझर्व्ह बँकेने डिजिटल बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये ग्राहकांना शक्य तितके संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी बँकांना अधिक जबाबदार बनवण्यात आले आहे. डिजिटल फसवणूक रोखता येईल अशी प्रणाली विकसित करण्यावर रिझर्व्ह बँकेने भर दिला आहे. अशा प्रकारे ग्राहकांचे दायित्व कमी झाल्याचंही सीतारामन म्हणाल्या.

SBI सिम बाईंडिंग फीचरचा वापर करा
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना डिजिटल फसवणुकीपासून वाचवण्यासाठी एक मोठं पाऊल उचलले आहे. SBI ने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या Yono आणि Yono Lite अॅपमध्ये 'सिम बाइंडिंग' हे नवीन सिक्युरिटी फीचर लाँच केले आहे. यामुळे ग्राहकांचे डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण होईल. सिम बाइंडिंग फीचरसरह YONO आणि YONO Lite फक्त त्या डिव्हाइसवर काम करेल ज्या मोबाइल क्रमांकाचं सिम बँकेत नोंदणीकृत आहे.

Web Title: Fall in ATM Debit card fraud while internet banking and credit card fraud increased Information of Finance Minister nirmala sitharaman budget session 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.