जळगाव : परदेशातून होणारी आवक कमी असल्याने भाववाढ झालेली चांदी आता मोडीच्या माध्यमातून बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने भावही कमी होत आहे. आता थेट एक हजार रुपयांनी चांदीचे भाव कमी होऊन ती ४८ हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
लॉकडाऊमुळे बंद असलेला सुवर्णबाजार सुरू झाला तरी विदेशातून होणारी चांदीची आवक नसल्याने भाव थेट ५० हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. त्यानंतर भाव कमी होऊ लागले. ५ जून रोजी सुवर्णबाजार सुरू झाल्यानंतर ६ जून रोजी चांदीत दीड हजार रुपयांनी घसरण झाली व ती ४८ हजार ५०० रुपयांवर आली. त्यानंतर पुन्हा त्यात ५०० रुपयांची वाढ झाली व ती ४९ हजारांवर पोहोचली. बाजारात मोडच्या माध्यमातून चांदी उपलब्ध होऊ लागली व तिचे भाव कमी-कमी होण्यास आता मदत होत आहे. सोमवार, १५ जून रोजी एकाच दिवसात चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे ४९ हजार रुपये प्रतिकिलो असलेली चांदी ४८ हजारांवर आली.
सोन्यात किरकोळ फरक
चांदीत एक हजार रुपयांनी घसरण झाली असली तरी सोन्याच्या भावात फारसा फरक नाही.
सोमवार, १५ जून रोजी सोन्यात १०० रुपये प्रतितोळ्याने वाढ झाली. ४७ हजार ७०० रुपयांवर असलेले सोने आता ४७ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे.
विशेष म्हणजे अमेरिकन डॉलरचे दर वाढून ७६.११ रुपये झाले असले तरी सोन्याच्या भावात जास्त वाढ नाही. डॉलरचे दर वाढले असले तरी चांदीचे भाव घसरले आहे.
चांदीच्या दरामध्ये हजार रुपयांची घसरण
थेट एक हजार रुपयांनी चांदीचे भाव कमी होऊन ती ४८ हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 11:04 PM2020-06-15T23:04:09+5:302020-06-15T23:04:26+5:30