Join us

शेअर बाजारात नफेखोरीमुळे घसरण

By admin | Published: August 07, 2015 9:57 PM

नफेखोरी आणि भेल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा वित्तीय परिणाम असमाधानकारक आल्याने भारतीय शेअर बाजार घसरला. गुंतवणूकदारांनी बँकिंग

मुंबई : नफेखोरी आणि भेल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा वित्तीय परिणाम असमाधानकारक आल्याने भारतीय शेअर बाजार घसरला. गुंतवणूकदारांनी बँकिंग आणि औषधी क्षेत्रातील काही निवडक कंपन्यांचे शेअर्स विकून नफा कमावणे पसंत केल्याने मुंबई शेअर बाजाराची सुरुवात चांगली होऊनही अखेर घसरणीत झाली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) शुक्रवारी ६१.७४ अंकांनी घरंगळत २८,२३६.३९ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २४.०५ अंकांनी घसरत ८,५६४.६० वर आला.अमेरिकी सरकार रोजगाराची आकडेवारी जारी करण्याआधीच गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. या आकडेवारीवरून अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविणार की नाही, याचे संकेत मिळण्याची दाट शक्यता आहे, असे जिओजीत बीएनपी परिबास फायनान्शियल सर्व्हिसेजच्या संशोधन विभागाचे प्रमुख अ‍ॅलेक्स मॅथ्यूज यांनी सांगितले.भेलच्या नफ्यात जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत घट झाल्याने बाजार हादरला. या कंपनीचा शेअर ५.८१ टक्क्यांनी घसरला.