Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची पाचव्या दिवशीही घसरण

सेन्सेक्सची पाचव्या दिवशीही घसरण

शेअर बाजारांनी गुरुवारी सलग पाचव्या दिवशी घसरण नोंदविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२.१४ अंकांनी घसरून २८,८५0.९७ अंकांवर बंद झाला.

By admin | Published: February 6, 2015 01:38 AM2015-02-06T01:38:42+5:302015-02-06T01:38:42+5:30

शेअर बाजारांनी गुरुवारी सलग पाचव्या दिवशी घसरण नोंदविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२.१४ अंकांनी घसरून २८,८५0.९७ अंकांवर बंद झाला.

Falling for the fifth day of the Sensex | सेन्सेक्सची पाचव्या दिवशीही घसरण

सेन्सेक्सची पाचव्या दिवशीही घसरण

मुंबई : शेअर बाजारांनी गुरुवारी सलग पाचव्या दिवशी घसरण नोंदविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२.१४ अंकांनी घसरून २८,८५0.९७ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा दोन आठवड्यांचा नीचांक ठरला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी १२ अंकांनी घसरून ८,७११.७0 अंकांवर बंद झाला. २0 जानेवारीनंतरचा निफ्टीचा हा सर्वांत नीचांकी बंद ठरला आहे.
सकाळी सेन्सेक्स तेजीसह उघडून २९,२७७.८३ अंकांपर्यंत वर चढला होता. तब्बल ३९५ अंकांची वाढ त्याने मिळविली होती. नंतर तो घसरणीला लागला. असमाधानकारक तिमाही निकाल आणि मंदीचा फटका सेन्सेक्सला बसला. कालच्या तुलनेत 0.११ टक्क्यांची अथवा ३२.१४ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २८,८५0.९७ अंकांवर बंद झाला. गेल्या पाच सत्रांत सेन्सेक्सने ८३0.८0 अंक गमावले आहेत.गुरुवारचा बंद हा २0 जानेवारीनंतरचा सर्वांत नीचांकी बंद ठरला. (वृत्तसंस्था)

Web Title: Falling for the fifth day of the Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.