मुंबई : मासिक वायदे व्यवहार कराराची मुदत संपल्याने तसेच अमेरिकी फेडरल रिझर्व्हने डिसेंबरमध्ये व्याजदर वाढीचे संकेत दिल्याने भारतीय शेअर बाजाराने आज सलग चौथ्या दिवशी घसरणीचा पाढा घोकला. दोन महिन्यांतील नीचांक गाठत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २७ हजारांखाली आला.डॉलरच्या तुलनेत रुपयांत झालेली घसरण, युरोपियन बाजाराची नकारात्मक सुरुवात आणि काही प्रमुख कंपन्याच्या असमाधानकारक वित्तीय परिणामामुळे गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. बँकिंग, वीज, भांडवली वस्तू ,एफएमसीजी, धातू तसेच रिफायनरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नफेखोरी झाली. मुंबई शेअर बाजाराची सुरुवातच निराशाजनक झाली. मध्यंतरी निर्देशांक काहीसा वधारला. तथापि, दिवसअखेर २०१.६२ अंकांनी खालावत बीएसई निर्देशांक (सेन्सेक्स) २६,८३८.१४ वर स्थिरावला. १४ आॅक्टोबरनंतरचा हा नीचांकआहे.राष्ट्रीय शेअर बाजारातही आज सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५९.४५ अंकानी खालावत ८,१११.७५ वर आला.
सलग चौथ्या दिवशी घसरणीचा पाढा
By admin | Published: October 29, 2015 9:33 PM