Lokmat Money > बिझनेस न्यूज > घसरण, घबराट अन्... घसरगुंडी

घसरण, घबराट अन्... घसरगुंडी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित निवडीमुळे बाजारात झालेली घसरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोट बॉम्बमुळे घबराटीत परिवर्तित झाली आणि त्यानंतर

By admin | Published: November 14, 2016 01:19 AM2016-11-14T01:19:50+5:302016-11-14T01:19:50+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित निवडीमुळे बाजारात झालेली घसरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोट बॉम्बमुळे घबराटीत परिवर्तित झाली आणि त्यानंतर

Falling, frightening and ... slippery | घसरण, घबराट अन्... घसरगुंडी

घसरण, घबराट अन्... घसरगुंडी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित निवडीमुळे बाजारात झालेली घसरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोट बॉम्बमुळे घबराटीत परिवर्तित झाली आणि त्यानंतर बाजाराने अनुभवली ती केवळ घसरगुंडी. नुकत्याच संपलेल्या सप्ताहाचे हे झाले धावते समालोचन. या सप्ताहातील विविध वेगवान घटनांमुळे बाजारातील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे आणखी काय काय बघायला मिळणार, याचीच चिंता गुंतवणूकदारांना लागून राहिली आहे. शुक्रवारी शेअर बाजारामध्ये झालेल्या मोठ्या घसरगुंडीमुळे बाजार साडेचार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला.
गतसप्ताह तांत्रिक दृष्टीने समतोल राहिला. पाच दिवसांच्या व्यवहारांमध्ये तीन दिवस निर्देशांकात वाढ झाली. मात्र, सप्ताहाचा ताळेबंद लाल रंगात आला. साडेचार महिन्यांतील नीचांकी पातळी गाठणाऱ्या बाजारातील निर्देशांकाला २७ हजारांची पातळीही राखता आली नाही. सप्ताहभरात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४५५.३३ अंशांनी घसरून २६८१८.८२ अंशांवर बंद झाला. शुक्रवारी बाजारात मोठी घसरगुंडी झाली. एकाच दिवसामध्ये निर्देशांक ६९९ अंशांनी खाली आला. सन २०१६ मधील ही दुसऱ्या क्रमांकाची घसरण होय. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १८८.६५ अंशांनी घसरून ८२९६.३० अंशांवर बंद झाला. शुक्रवारी या निर्देशांकात झालेली २२९ अंश म्हणजेच २.७ टक्क््यांची घसरण ही या कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक घसरण ठरली.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प यांची निवड झाल्याने, अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता वाढली आहे. यामुळेच परकीय वित्तसंस्थांनी भारतासह सर्वच आशियाई बाजारांमध्ये विक्री करण्याचाच पवित्रा कायम राखला. या संस्थांनी गतसप्ताहामध्ये सुमारे २००० कोटी रुपये बाजारातून काढून घेतल्याने बाजार आणखीनच खाली आला. त्यातच डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाच्या मूल्यामध्ये ५२ पैशांनी वाढ झाली. यामुळे डॉलरला आता ६७ रुपयांहून अधिक पैसे पडत आहेत.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने बाजारात घसरगुंडी झाली. नोटा रद्दच्या बॉम्बमुळे बाजारावर विक्रीचे दडपण वाढले. या निर्णयामुळे आगामी काही सप्ताह चलनाची चणचण जाणवणार असल्यामुळेही बाजारात चिंता होती. मात्र, यामुळे बॅँकांची वसुली चांगली झाल्याने हे समभाग तरले. सप्ताहामध्ये आलेले अनेक आस्थापनांचे निकाल फारसे समाधानकारक नसल्यामुळेही बाजारातील विक्रीचा रेटा वाढला.

Web Title: Falling, frightening and ... slippery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.