नवी दिल्ली : मागणी कमी झाल्याने सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ७० रुपयांनी घटून २६,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारात मजबूत स्थिती असतानाही ही घट नोंदली गेली आहे. दुसरीकडे चांदीचा भाव ५० रुपयांनी वधारून ३६,०५० रुपये प्रतिकिलो राहिला.आभूषण निर्माते व किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी घटल्याने सोन्याच्या भावात ही घट नोंदली गेली आहे. जागतिक पातळीवर सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी वधारून १,१६२.३० डॉलर प्रतिऔंस आणि चांदीही ०.६ टक्क्यांच्या तेजीसह १५.७४ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.दुसरीकडे तयार चांदीचा भाव ५० रुपयांनी वाढून ३६,०५० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही २७५ रुपयांच्या तेजीसह ३५,८०५ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५६,००० रुपये व विक्रीसाठी ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)४राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव ७० रुपयांच्या घसरणीसह २६,३५० रुपये व ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भावही २० रुपयांनी घटून २६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. तथापि, सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,६०० रुपयांवर कायम राहिला.
सोन्याच्या भावात घसरण
By admin | Published: March 16, 2015 11:30 PM