मुंबई : जागतिक पातळीवर वाढलेल्या व्यापारविषयक चिंता आणि स्थानिक पातळीवर गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याचा अभाव यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११४.९४ अंकांनी घसरून ३५,४३२.३९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०.९५ अंकांनी घसरून १०,७४१.१० अंकावर बंद झाला. घसरणीचा कल असतानाही रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स आणि इन्फोसिस यांचे समभाग वाढले. एम अँड एम, ओएनजीसी, पॉवर ग्रीड, एसबीआय, सन फार्मा, एशियन पेंट्स, बजाज आॅटो यांचे समभाग मात्र घसरले. (वृत्तसंस्था)
व्यापारविषयक वाढत्या चिंतांमुळे बाजारात घसरण
जागतिक पातळीवर वाढलेल्या व्यापारविषयक चिंता आणि स्थानिक पातळीवर गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याचा अभाव यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११४.९४ अंकांनी घसरून ३५,४३२.३९ अंकांवर बंद झाला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:06 AM2018-06-22T01:06:16+5:302018-06-22T01:06:16+5:30