Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारात घसरण

फेडरल रिझर्व्हच्या अंदाजानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये विक्रीचा जोर वाढला. त्याचाच प्रभाव भारतामध्येही दिसून आल्याने शेअर बाजारामध्ये घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 05:26 AM2020-08-21T05:26:55+5:302020-08-21T05:27:06+5:30

फेडरल रिझर्व्हच्या अंदाजानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये विक्रीचा जोर वाढला. त्याचाच प्रभाव भारतामध्येही दिसून आल्याने शेअर बाजारामध्ये घसरण झाली.

Falling stock market | शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारात घसरण

मुंबई : अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत फारसे आशादायक चित्र नसल्याच्या फेडरल रिझर्व्हच्या अंदाजानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये विक्रीचा जोर वाढला. त्याचाच प्रभाव भारतामध्येही दिसून आल्याने शेअर बाजारामध्ये घसरण झाली. मुंबई शेअर बाजारामध्ये व्यवहारांची सुरुवातच घसरणीने झाली. दिवसभरामध्ये सेन्सेक्स वर-खाली होत अखेरीस ३८,२२०.३९ अंशांवर बंद झाला. त्यामध्ये १.२ टक्के म्हणजे ३९४.४० अंशांची घट
झाली.
राष्टÑीय शेअर बाजारामध्येही मंदीचेच वातावरण राहिले. येथील निर्देशांक (निफ्टी) ९६.२० अंशांनी खाली येऊन ११,३१२.२० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र ०.८७ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून
आली.
टेलिकॉम, बॅँकेक्स, फायनान्स, एनर्जी, एफएमसीजी आणि आॅटो या विविध क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र घट झालेली दिसून आली.

Web Title: Falling stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.