महिनाअखेरचे वेध : सेन्सेक्स ४९ अंकांनी, निफ्टी ७ अंकांनी उतरले
मुंबई : शेअर बाजारातील सलग तीन सत्रांच्या तेजीचा सिलसिला सोमवारी थांबला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४९ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७ अंकांनी खाली आला. बड्या कंपन्यांच्या समभागांत झालेली नफावसुली, तसेच आशियाई बाजारातील नरमाई याचा फटका भारतीय बाजारांना बसला.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी तेजीने उघडला होता. तथापि, नंतर नफावसुली सुरू झाल्याने तो घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस ४९.१५ अंक अथवा 0.१९ टक्क्यांच्या घसरणीसह तो २५,८१९.३४ अंकांवर बंद झाला. गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्स ३८५.९७ अंकांनी वाढला होता. निर्यातदारांसाठी पुढील पाच वर्षे ३ टक्के व्याज सबसिडी देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्याचा फायदा मिळून बाजार तेजीत आले होते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून डिसेंबरमध्ये व्याजदरांत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध असल्याचे सूत्रांनी सांगितले.५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७.३0 अंकांनी अथवा 0.0९ टक्क्यांनी घसरला. सत्राच्या अखेरीस निफ्टी ७,८४९.२५ अंकांवर बंद झाला. टाटा स्टीलचा समभागही २.३१ टक्क्यांनी घसरला. (वृत्तसंस्था)
नफावसुलीमुळे शेअर बाजारात घसरण
शेअर बाजारातील सलग तीन सत्रांच्या तेजीचा सिलसिला सोमवारी थांबला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४९ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७ अंकांनी खाली आला
By admin | Published: November 23, 2015 09:58 PM2015-11-23T21:58:15+5:302015-11-23T21:58:15+5:30