Join us  

कुटुंबाला हवे ‘हॅप्पी होम’, देशात ४.३५ लाख नवी घरे; घरांची संख्या ८ टक्के वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 7:10 AM

देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये मागील वर्षभरात बांधलेल्या नव्या घरांचे प्रमाण ८ टक्क्यांनी वाढले आहे. नव्या घरांची संख्या ४.३५ लाखांवर गेल्याचे रिअल इस्टेट सल्लागार कंपनी ॲनारॉकच्या अहवालातून समोर आले आहे.

नवी दिल्ली : देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये मागील वर्षभरात बांधलेल्या नव्या घरांचे प्रमाण ८ टक्क्यांनी वाढले आहे. नव्या घरांची संख्या ४.३५ लाखांवर गेल्याचे रिअल इस्टेट सल्लागार कंपनी ॲनारॉकच्या अहवालातून समोर आले आहे.

ॲनारॉकच्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये ४,३५,०४५ नव्या घरांची निर्मिती झाली. २०२२ मध्ये हीच संख्या ४.०२ लाख इतकी होती. ॲनारॉकचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले की, घरांच्या विक्रीचे प्रमाण २०२३ मध्ये सर्वाधिक होते. २०२४ मध्येही हाच कल कायम राहील. घरांच्या निर्मितीचे प्रमाण २०१७ नंतर सर्वाधिक झाले आहे. बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये २०२३ मध्ये एकूण ८७,१९० घरांची बांधणी पूर्ण करण्यात आली. २०२२ मध्ये घरांची हीच संख्या ८१,५८० इतकी होती. (वृत्तसंस्था)

पाच वर्षांतील घरांची सर्वाधिक निर्मिती

२०१७- २,०४,२००

२०१८- २,४६,१४०

२०१९- २,९८,४५०

२०२०- २,१४,३७०

२०२१- २,७८,६५०

कोणत्या शहरात किती घरे वाढली?

शहर    २०२३  २०२२   वाढ / घट

एमएमआर      १,४३,५००       १,२६,७२०  +१३ टक्के

एनसीआर       १,१४,२८०       ८६,३००         +३२ टक्के

पुणे    ६५,००० ८४,२००         -२३ टक्के

कोलकाता       २५,०७५ २३,१९०         +२३ टक्के