अकोला : गेल्या दोन महिन्यांपूर्वी गगनाला भिडलेला तुरीचा दर आजमितीस गडगडला असून, बाजारात सध्या तुरीला प्रतवारीनुसारी साडेसहा ते आठ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्ंिवटल दर मिळत आहे. एकीकडे तूर काढणीचा हंगाम संपत आला आहे आणि तुरीच्या दरात सारखा चढ-उतार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.
तूर पिकाबाबत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमाकांवर असून लातूर, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, अकोला व नागपूर महाराष्ट्रातील तुरीचे प्रमुख व्यापारी केंद्रे आहेत. मागील वर्षी व मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी तुरीचे दर हे १० ते १२ हजार रुपये प्रतिक्ंिवटलवर पोहोचल्याने शेतकऱ्यांनी या खरीप हंगामात तुरीच्या पेरणीत वाढ केली; परंतु डिसेंबरमध्ये तूर काढणीचा हंगाम सुरू होताच बाजारातील तुरीचा दर १२ हजार रुपयांहून साडेसहा ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरला
आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतवारी बघून साडेसहा हजार ते नऊ हजार रुपये प्रतिक्ंिवटलने तुरीची खरेदी केली जात आहे.
दरम्यान, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे उत्पादन यावर्षी कमी झाल्याने तूर साथ देईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती; परंतु तुरीच्या दरात आजमितीस ३ ते ४ हजार रुपये क्विंटलने घसरण झाली आहे.
डॉ. पंदेकृविच्या कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग व एन.ए.आय.पी. कृषी विपणन माहिती केंद्राच्या संशोधन चमूने लातूर बाजारपेठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील तुरीच्या किमतीचे मासिक सरासरी पृथक्करण करू न समतोल हवामानात तुरीची डिसेंबर २०१५ मध्ये सरासरीची किंमत जवळपास ७,५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता वर्तविली होती. असे असले तरी देशातील तुरीचे अल्प उत्पादन व वाढलेला दर बघता चालू हंगामात तुरीचा १० ते १२ हजार रुपये प्रतिक्ंिवटल दर टिकून राहील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती; परंतु शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
तुरीचा भाव गडगडल्याने शेतकरी हैराण
गेल्या दोन महिन्यांपूर्वी गगनाला भिडलेला तुरीचा दर आजमितीस गडगडला असून, बाजारात सध्या तुरीला प्रतवारीनुसारी साडेसहा ते आठ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्ंिवटल दर मिळत आहे
By admin | Published: January 11, 2016 03:03 AM2016-01-11T03:03:34+5:302016-01-11T03:03:34+5:30