Lokmat Money > बिझनेस न्यूज > Safeda Farming : एक हेक्टरमध्ये एवढी सफेदाची झाडे लावा, अवघ्या पाच वर्षात व्हाल करोडपती!

Safeda Farming : एक हेक्टरमध्ये एवढी सफेदाची झाडे लावा, अवघ्या पाच वर्षात व्हाल करोडपती!

Safeda Farming : देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी सफेदाची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. सफेदाची शेती करून शेतकरी सहज करोडपती होऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 11:19 AM2022-09-23T11:19:31+5:302022-09-23T11:23:13+5:30

Safeda Farming : देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी सफेदाची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. सफेदाची शेती करून शेतकरी सहज करोडपती होऊ शकतात.

farmers can become crorepati by safeda farming in just 5 years | Safeda Farming : एक हेक्टरमध्ये एवढी सफेदाची झाडे लावा, अवघ्या पाच वर्षात व्हाल करोडपती!

Safeda Farming : एक हेक्टरमध्ये एवढी सफेदाची झाडे लावा, अवघ्या पाच वर्षात व्हाल करोडपती!

सध्या पारंपारिक शेती करण्यापेक्षा आधुनिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल दिसून येत आहे. यातच शेतकऱ्यांमध्ये विविध झाडांची लागवड खूप लोकप्रिय होत आहे. या झाडांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना फार कमी वेळात चांगला नफा मिळतो. देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी सफेदाची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. सफेदाची शेती करून शेतकरी सहज करोडपती होऊ शकतात.

फर्निचर, इंधन आणि कागदाचा लगदा तयार करण्यासाठी सफेदाच्या लाकडाचा वापर केला जातो. हे झाडाची वाढ पूर्ण होण्यासाठी सरासरी 5 ते 6 वर्षे लागतात. त्याच्या लागवडीसाठी तापमान 30 ते 35 अंशांच्या आसपास असते. तसेच, शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित असावा लागतो. पिकांचे नुकसान होऊ नये, याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागते. 

सफेदाची रोपे लावण्यापूर्वी शेतात नांगरणी करावी. नांगरणीनंतर माती भुसभुशीत करावी.  भुसभुशीत केल्यानंतर 5 फूट अंतरावर एक फिट रुंदीचे व खोलीचे खड्डे तयार करावेत. प्रत्येक रांगेत 5 ते 6 फूट अंतर ठेवावे. तज्ज्ञांच्या मते, एक हेक्टर क्षेत्रात 3000 हजार सफेदाची रोपे लावता येतात. ही रोपे नर्सरीतून अगदी सहज 7 किंवा 8 रुपयांना मिळतात. या अंदाजानुसार, त्याच्या लागवडीसाठी केवळ 21 हजार ते 30 हजार रुपये खर्च होतात. याशिवाय, या झाड्यांच्या देखभाल व सिंचनावर दरवर्षी 20 ते 30 हजार रुपये खर्च होतात.

कोटी रुपयांपर्यंत कमाई! 
सफेदाच्या एका झाडापासून सुमारे 400 किलो लाकूड मिळते. बाजारात एक किलो लाकडाची किंमत सहा ते नऊ रुपये किलो दराने विकली जाते. तीन हजार झाडे लावा. त्यामुळे तुम्ही एक कोटी रुपयांपर्यंत सहज कमाई करू शकता.

Web Title: farmers can become crorepati by safeda farming in just 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.