Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेतकऱ्यांना द्यावा लागेल आयकर? सरकार करू शकते विचार

शेतकऱ्यांना द्यावा लागेल आयकर? सरकार करू शकते विचार

वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत गोयल यांनी ही माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:11 PM2024-01-19T12:11:47+5:302024-01-19T12:11:59+5:30

वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत गोयल यांनी ही माहिती दिली.

Farmers have to pay income tax? Think the government can | शेतकऱ्यांना द्यावा लागेल आयकर? सरकार करू शकते विचार

शेतकऱ्यांना द्यावा लागेल आयकर? सरकार करू शकते विचार

नवी दिल्ली : श्रीमंत शेतकऱ्यांना आयकर लावण्याचा विचार भारत सरकार करू शकते, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्य आशिमा गोयल यांनी केले आहे. 

वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत गोयल यांनी ही माहिती दिली. गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार पैसे हस्तांतरित करते. हा नकारात्मक आयकरच आहे. आता श्रीमंत शेतकऱ्यांना सकारात्मक आयकर लावला जाऊ शकतो, असे त्या म्हणाल्या. 

आर्थिक वृद्धीसाठी एकपक्षीय राजवट चांगली की, आघाडी सरकारची राजवट चांगली, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, कोणत्याही सरकारच्या वृद्धीदराचे आकलन करताना त्याला वारशात मिळालेल्या वृद्धीदराचाही विचार करावा लागतो.  आघाडीच्या सरकारांना किमान सहमतीवर काम करावे लागते. मात्र, त्यांना घटक पक्षांच्या अल्पकालीन हिताची धोरणेही राबवावी लागतात. 

Web Title: Farmers have to pay income tax? Think the government can

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.