Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यातील शेतकरी वळतोय शेडनेट, पॉलिहाऊस शेतीकडे

राज्यातील शेतकरी वळतोय शेडनेट, पॉलिहाऊस शेतीकडे

‘संरक्षित शेती’ करण्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला असून, पश्चिम विदर्भातील शेतकरी आता शेडनेट, पॉली हाऊस शेती करीत आहेत.

By admin | Published: September 4, 2015 10:07 PM2015-09-04T22:07:14+5:302015-09-04T22:07:14+5:30

‘संरक्षित शेती’ करण्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला असून, पश्चिम विदर्भातील शेतकरी आता शेडनेट, पॉली हाऊस शेती करीत आहेत.

Farmers in the state turn sidenet, polyhauce in agriculture | राज्यातील शेतकरी वळतोय शेडनेट, पॉलिहाऊस शेतीकडे

राज्यातील शेतकरी वळतोय शेडनेट, पॉलिहाऊस शेतीकडे

अकोला : ‘संरक्षित शेती’ करण्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला असून, पश्चिम विदर्भातील शेतकरी आता शेडनेट, पॉली हाऊस शेती करीत आहेत. या हरितगृह शेतीसाठी वऱ्हाडाला यावर्षी ४ कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पॉली हाऊस-शेडनेट उभारणीकडे त्यांचा कल वाढला आहे. फळे, फुले, भाजीपाला पिकांसह या बीजोत्पादनाचा कार्यक्रम शेतकरी घेऊ लागले आहेत. वऱ्हाडाच्या विकासासाठी हे चांगले संकेत मानले जात आहेत.
सतत बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम पारंपरिक पिकावर होत आहे. या पारंपरिक पिकाच्या जोडीला नियंत्रित वातावरणातील पिकांचा आधार घेतल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून प्रगती होईल. म्हणूनच पॉली हाऊस शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून, संरक्षित शेतीला प्रोत्साहन व उत्पादनवाढीसाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत.
त्याकरिता एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत अभियानाचे शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध केले जात आहे. यामध्ये मुख्यत्वे शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, हरितगृह, प्लास्टिक टनेल यासाठी अनुदान उपलब्ध आहे.
यावर्षी पश्चिम विदर्भाला ४ कोटी ७५ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे.
जिल्हानिहाय बुलडाणा जिल्ह्याला १ कोटी रुपये मंजूर झाले असून, अकोला जिल्हा १ कोटी १५ लाख, वाशिम ३८ लाख, अमरावती जिल्हा १ कोटी ४४ लाख, तर यवतमाळ जिल्ह्यासाठी ७८ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

Web Title: Farmers in the state turn sidenet, polyhauce in agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.