Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेतकरी चिंतेत, ग्राहक हैराण!, बेपत्ता मान्सूनमुळे महागाईचे ढग; उत्पादन घटणार, तेल व डाळी महागणार

शेतकरी चिंतेत, ग्राहक हैराण!, बेपत्ता मान्सूनमुळे महागाईचे ढग; उत्पादन घटणार, तेल व डाळी महागणार

दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचे उत्पादन घटण्याची भीती आहे. परिणामी पुन्हा एकदा महागाई डाेके वर काढू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 06:52 AM2023-09-01T06:52:19+5:302023-09-01T06:52:48+5:30

दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचे उत्पादन घटण्याची भीती आहे. परिणामी पुन्हा एकदा महागाई डाेके वर काढू शकते.

Farmers Worried, Consumers Confused!, Missing Monsoon Clouds Inflation; Production will decrease, oil and pulses will become expensive | शेतकरी चिंतेत, ग्राहक हैराण!, बेपत्ता मान्सूनमुळे महागाईचे ढग; उत्पादन घटणार, तेल व डाळी महागणार

शेतकरी चिंतेत, ग्राहक हैराण!, बेपत्ता मान्सूनमुळे महागाईचे ढग; उत्पादन घटणार, तेल व डाळी महागणार

नवी दिल्ली : यंदाचा ऑगस्ट गेल्या १२२ वर्षांतील सर्वात काेरडा ठरला आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश वगळता देशभरात बहुतांश भागांमध्ये पावसाने दांडी मारली आहे. सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा स्थितीत, खरीप हंगाम धाेक्यात आला आहे. दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचे उत्पादन घटण्याची भीती आहे. परिणामी पुन्हा एकदा महागाई डाेके वर काढू शकते.
‘अल निनाे’च्या प्रभावामुळे यंदा पाऊस गायब झाला आहे. ज्या वर्षी हा घटक सक्रिय हाेताे, त्यापैकी ७० टक्के वर्षांमध्ये सप्टेंबरमध्ये १० टक्के कमी पाऊस झाला आहे. यामुळे खाद्यान्न महागाई वाढू शकते.
तज्ज्ञांच्या मते, चांगला पाऊस न झाल्यास देशात धान, ऊस, डाळी, तेल, मूग, कापूस तसेच साेयाबीन यासारख्या महत्त्वाच्या पिकांवर परिणाम हाेण्याची शक्यता आहे.

या राज्यांमध्ये कमी पावसाची नाेंद
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, राजस्थान, बिहार, तेलंगणा या प्रमुख शेती उत्पादक राज्यांमध्ये ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा ३० ते ९० % कमी पाऊस झाला आहे.

रब्बीच्या पेरणीवरही परिणाम होणार?
हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय माेहपात्रा यांच्या माहितीनुसार, अल निनाे डिसेंबरपर्यंत सक्रिय राहू शकताे. तसे झाल्यास रब्बी पिकांच्या पेरणीवरही याचा परिणाम हाेईल, अशी भीती केअर रेटिंगने व्यक्त केली आहे.

वाढती महागाई राेखण्यासाठी सरकारने काय उपाय केले?
तांदळाच्या निर्यातीवर शुल्क लावले आहे. १,२०० डाॅलरपेक्षा कमी किंमतीच्या बासमती तांदळाची निर्यातबंदी. गहूपिठाच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी सरकारने ५० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला.
डाळीच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी १० लाख टन डाळ आयात करण्याचा निर्णय. साठेबाजीवर मर्यादा लावल्या.
साखर कडू व्हायला नकाे म्हणून २ लाख टन अतिरिक्त साखर खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला.
 

Web Title: Farmers Worried, Consumers Confused!, Missing Monsoon Clouds Inflation; Production will decrease, oil and pulses will become expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.