Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशांतर्गत वित्तसंस्थांमुळे बाजारात तेजीचा मौसम

देशांतर्गत वित्तसंस्थांमुळे बाजारात तेजीचा मौसम

राजकारणामध्ये निर्माण झालेला तणाव, खनिजतेलाच्या दरामध्ये होत असलेली वाढ, रुपयाची सुरू असलेली घसरण आणि परकीय वित्तसंस्थांनी केलेली मोठी विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:37 AM2018-05-14T02:37:40+5:302018-05-14T02:37:40+5:30

राजकारणामध्ये निर्माण झालेला तणाव, खनिजतेलाच्या दरामध्ये होत असलेली वाढ, रुपयाची सुरू असलेली घसरण आणि परकीय वित्तसंस्थांनी केलेली मोठी विक्री

Faster weather in the market due to domestic financial institutions | देशांतर्गत वित्तसंस्थांमुळे बाजारात तेजीचा मौसम

देशांतर्गत वित्तसंस्थांमुळे बाजारात तेजीचा मौसम

प्रसाद गो. जोशी
आंतरराष्टÑीय राजकारणामध्ये निर्माण झालेला तणाव, खनिजतेलाच्या दरामध्ये होत असलेली वाढ, रुपयाची सुरू असलेली घसरण आणि परकीय वित्तसंस्थांनी केलेली मोठी विक्री अशा नकारात्मक घटनांच्या पार्श्वभूमीवर विविध आस्थापनांचे आलेले आशादायक निकाल आणि देशांतर्गत वित्तसंस्थांनी केलेली मोठी खरेदी, यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. गुरुवारचा अपवाद वगळता निर्देशांक वाढले.
मागील सप्ताहामध्ये खाली येऊन बंद झालेल्या बाजारात सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३४९८३.५९ असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर, तो ३५५९६.१५ ते ३४९७७.७४ अंशांदरम्यान हेलकावत ३५५३५.७९ अंशांवर बंद झाला. त्यामध्ये ६२०.४१ अंशांची (१.७८ टक्के) वाढ झाली. सप्ताहामध्ये गुरुवारचा अपवाद वगळता, रोजच निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झालेला दिसून आला.
राष्टÑीय शेअर बाजारामध्येही तेजी बघावयास मिळाली. येथील निर्देशांक (निफ्टी) १८८.२५ अंश म्हणजे १.७७ टक्क्यांनी वाढून १०८०६.५० अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहात तो १०६१८.२५ अंश होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक मात्र विक्रीचा मारा झाल्याने खाली आले. मिडकॅप १६३४३.९९ अंशांवर (घट २१७.०२ अंश), तर स्मॉलकॅप १७८१८.०९ (घट १७३.३६) अंशांवर बंद झाले.
अमेरिकेने इराणबरोबरचा अणू करार रद्द करून इराणवर निर्बंध लादल्याने आंतरराष्टÑीय राजकारणात तणाव निर्माण झाला. परिणामी, खनिजतेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली, तसेच अमेरिकेतील नोकरीविषयक अहवालही नकारात्मक आल्याने जागतिक बाजारांमध्ये निराशेचे वातावरण राहिले.
निराशेच्या वातावरणामुळे परकीय वित्तसंस्थांनीही भारतात मोठी विक्री केली. मात्र, देशांतर्गत वित्तसंस्थांनी बाजारात मोठी खरेदी केल्याने बाजार वाढला, तसेच काही आस्थापनांचे निकालही आशादायक आले.

ांतरराष्टÑीय बाजारातील खनिजतेलाच्या वाढत्या किमती, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा नकारात्मक परिणाम, सरकारी रोख्यांवरील उत्पन्नामध्ये होत असलेली वाढ आणि बाजारात नफा कमविण्याची मिळालेली संधी अशा विविध कारणांनी परकीय वित्तसंस्थांनी मे महिन्यातील आठ सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजारातून १२६.७१ अब्ज रुपये म्हणजेच सुमारे २ अब्ज डॉलर काढून घेतले आहेत.
२ ते ११ मे दरम्यान या संस्थांनी भारतीय बाजारात ४०.३० अब्ज रुपयांचे समभाग, तसेच ८६.४१ अब्ज रुपयांचे रोखे विकले आहेत. त्यामुळे या आठ सत्रांमध्ये या संस्थांची विक्री १२६.७१ अब्ज रुपये एवढी झाली आहे. एप्रिल महिन्यातही या संस्थांनी भांडवल बाजारातून १५५ अब्ज रुपये काढून घेतले आहेत. परकीय वित्तसंस्थांनी भांडवल बाजारातून पैसे काढून घेण्याची गेल्या १६ महिन्यांमधील उच्चांकी कामगिरी एप्रिल महिन्यात नोंदविली आहे.

Web Title: Faster weather in the market due to domestic financial institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.